spot_img

देऊळगाव माळी येथे नाथ भागवत, गीता जयंती, व दत्त जयंतीची महाप्रसादाने सांगता.

मेहकर (रवींद्र सुरूशे . रोखठोक न्यूज वृत्त सेवा)

श्री संत जनार्दन स्वामी सद्गुरु सेवा आश्रम देऊळगाव माळी येथे गेल्या पाच दिवसापासून नाथ भागवत, हरिनाम कीर्तन, दत्त जयंती सोहळा, गीता जयंती, अशा विविध सामाजिक, धार्मिक, कार्यक्रमाची महाप्रसादाने सांगता करण्यात आली. गेल्या पाच दिवसापासून ह.भ.प. प्रकाश महाराज मगर यांच्या अमृततुल्य वाणीतून नाथ भागवत श्रवणाचा भावीक भक्तांनी लाभ घेतला. या सप्ताह मध्ये ह.भ.प. शंकर महाराज इंगोले येवता, पंढरी महाराज वाघ कोऱ्हाळा बाजार, अमोलानंद महाराज सचितानंद आश्रम सावत्रा, शालिग्राम महाराज देशमुख मंडपगाव, यांची या सोहळ्यात कीर्तन सेवा लाभली.

त्याचबरोबर सद्गुरु जनार्दन स्वामी महाराज सेवा आश्रमाचे मठाधिपती ह.भ.प. बळीराम गिरी महाराज यांच्या सद्गुरु बोध या अभंग ग्रंथाचे प्रकाशन सोहळा सुद्धा अमोलानंद महाराज यांच्या हस्ते यावेळी पार पडला. 25 डिसेंबरला गावामधून श्रीदत्त, व संत जनार्दन स्वामी महाराज यांची सकाळी गावातून गावातील समस्त व पंचक्रोशीतील भजनी मंडळ यांच्या उपस्थितीत पालखी काढण्यात आली. यावेळी महिलांनी पालखी मार्गावर रांगोळी काढून मार्ग सुशोभित केला होता.

पालखी दत्त मंदिर झाल्यानंतर ह.भ.प प्रकाश महाराज मगर यांचे काल्याचे किर्तन संपन्न झाले. व त्यानंतर भव्य असा महाप्रसाद पार पडला. या संपूर्ण कार्यक्रमांमध्ये पंचक्रोशीतील भाविक भक्त, भजनी मंडळ, माता भगिनी, युवक वर्ग, व गावकरी मंडळी यांनी हा सोहळा पार पाडण्यासाठी मेहनत घेतली.

ताज्या बातम्या

ताज्या बातम्या