मेहकर (अनिल मंजुळकर रोखठोक न्यूज वृत्त सेवा)
मेहकर तालुक्यात दोन भाजपा तालुकाध्यक्ष ची निवड एकाच वेळी झाल्याने भाजपामधील अंतर्गत वाद पुन्हा एकदा चव्हाट्यावर आला आहे.
मेहकर तालुक्यातील भाजपा पक्षांतर्गत असलेले वाद हे नेहमी चर्चेत असतात, मेहकर तालुक्यात एकाच दिवशी दोन तालुका अध्यक्ष पदावर दोन वेगवेगळ्या व्यक्तींची निवड केल्याने भाजपा पक्षांतर्गत असलेले वाद पुन्हा उघड झाले आहे.
भाजपाच्या आमदार श्वेता ताई महाले जिल्हाध्यक्ष डॉक्टर गणेश मांटे यांनी मेहकर तालुका अध्यक्षपदी सारंग प्रकाश माळेकर यांची निवड केली, तर भाजपाच्या महामंत्री मंदाताई कंकाळ यांनी पूर्वीचे असलेले शिव ठाकरे यांची तिसऱ्यांदा तालुकाध्यक्षपदी आज निवड केल्याने मेहकर तालुक्यात भाजपाचे दोन तालुका अध्यक्ष झाल्याने या दोन भाजपा तालुका अध्यक्षपदी पैकी नेमका कोणाला पदभार मिळणार व कोण मेहेकर तालुका अध्यक्ष पदाच्या भाजपाचा दावेदार राहणार असे एक ना अनेक प्रश्न या निमित्ताने भाजपा पक्षांतर्गत लोक एकमेकांना विचारत आहेत, संपूर्ण महाराष्ट्रात फक्त मेहकर तालुक्यातच दोन भाजपाचे तालुकाध्यक्ष मिळाल्याने लोकांन मध्ये तालुकाध्यक्षाची कुतूहलाने चर्चा करताना दिसून आले.
तर मेहकर तालुक्यात भाजपा तालुका अध्यक्ष पदाचा सुरू झालेला वाद हा मिटणार की आणखी चिघळणार अगोदरच. मेहकर तालुक्यात भाजपाची स्थिती ही कमकुवत आहे, भाजपाच्या राजकीय नेत्यांची प्रतिष्ठापणाला लागली आहे. हा वाद चव्हाट्यावर आल्याने नेमका हा वाद कोण मिटवणार . याकडे संपूर्ण भाजपा कार्यकर्त्यांचे लक्ष लागले एवढे मात्र खरे.
अँड शिव ठाकरे यांना दोनदा तालुका अध्यक्ष पद …
भाजपाचे दोनदा तालुका अध्यक्ष भुषविले. यानंतर जिल्हा पातळीवर निवड करण्यात येते.तरी हि तालुका अध्यक्ष पदासाठी पुन्हा स्वयं घोषित दावेदार झाले आहेत. भाजपाच्या मेहकर तालुका अध्यक्ष पदात दडलंय तरी काय? असा प्रश्न भाजपाच्या राजकीय नेतेमंडळीत व कार्यकर्त्यांमध्ये उलटसुलट चर्चा सुरू आहे.