मेहकर (अनिल मंजुळकर. रोखठोक न्यूज वृत्त सेवा)
प्रकाश सावळे वनपरिक्षेत्र अधिकारी मेहकर/घाटबोरी यांना मिळालेल्या गुप्त माहिती वरुन घाटबोरी रेंज मधील मौजे घाटबोरी या ठिकाणी आरोपी जावेद अली अहमद अली घाटबोरी यांच्या घरी धाड टाकली असता सागवान चार गोल नग व कटसाईज एक नग अवैध माल आढळून आल्याने आरोपीस रंगेहाथ पकडण्यात आल्याने एकच खळबळ उडाली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार सदर माल व एक रंधा मशीन जप्त करण्यात आली जप्त केलेल्या मुद्देमालाची अंदाजी रक्कम 36000 रु इतकी असुन आरोपी विरुद्ध भारतीय वन अधिनियम नुसार वन गुन्हा जारी करण्यात आला. सदर कारवाई माननीय सरोज गवस, उपवसंरक्षक बुलढाणा,
तसेच सुशांत पाटील, सहा. वनसंरक्षक, मेहकर, प्रकाश सावळे वन परिक्षेत्र अधिकारी घाटबोरी यांच्या मार्गदर्शनाखाली उषा जाधव वनपाल घाटबोरी वर्तुळ श्री लठाड वनरक्षक घाटबोरी एस ए पडघान वनरक्षक वडाळी बीट सुधाकर गायकवाड वनरक्षक वागदेव बीट देवराव पवार वनरक्षक निंबा विठ्ठल झाल्टे वनरक्षक भोसा बिट दीपक सिंगल वनरक्षक बेलगाव कौशल्या ढाकणे वनरक्षक मांडवा बीट यांनी सदरची कारवाई केली