spot_img

डोणगाव ग्रामपंचायतचे दप्तरचे गौडबंगाल – शैलेश सावजी चा आरोप ; मुख्यकार्यकारी अधिकारी यांच्या आदेशाला ठेंगा दाखवत ग्रामपंचायत दप्तर पाहणी साठी आलेल्या अधिकाऱ्यांनी काढला पळ ! कारण हि तसेच…. वाचा सविस्तर बातमीत ….

 

मेहकर (अनिल मंजुळकर.रोखठोक न्यूज वृत्त सेवा)

बुलढाणा जिल्हातील सर्वात मोठी ग्रामपंचायत असून येथील कारभाराची नेहमी चर्चा रंगते अश्यातच येथील ग्रामपंचायत मधील फाइली हया जो ग्रामसेवक येतो तो सोबत घेऊन जातो त्यात खाते बुक, धनादेश असे महत्वाचे दप्तर ग्रामपंचायत मध्ये हजर नसल्याने ग्रामपंचायत दप्तर तपासणीची मागणी शैलेश सावजी यांनी मुख्य कार्यकारी अधिकारी बुलढाणा यांच्या कडे केली असता दप्तर तपासणी साठी आलेल्या अधिकाऱ्यांनी दफ्तर नसल्याचे पाहता तपासणी विनाच पळ काढला त्याने दप्तर तपासणीची मागणी करणारे शैलेश सावजी व शेक अय्युब यांनी ऐन दिवाळीत ग्रामपंचायत मध्ये मुक्काम ठोको आंदोलन केले.

डोणगाव ग्रामपंचायत मधील दप्तर हा तत्कालीन ग्राम सेवक आपल्या जवळ ठेऊन घेतो ज्याने ग्राम सभा, कामाच्या फायली, बँक खाते पासबुक, चेकबुक असे अनेक संवेदनशील अती महत्वाचे कागदपत्रे ही ग्रामपंचायत मध्ये राहत नाहीत अश्यातच तत्कालीन ग्रामपंचायत सचिवाने 13 व्या वित्त आयोगाच्या वापरात नसलेल्या खात्यातून पैसे काढले त्यात विशेष म्हणजे एका धनादेशा द्वारे 50 हजाराची रक्कम ही एका गावातील ग्रामपंचायत कर्मचाऱ्याच्या नावे काढली ज्याने ग्रामपंचायत मधील धनादेश सुरक्षित नसल्याचे दिसून येते

यावर शैलेश सावजी यांनी 10 नव्हेंबर रोजी मुख्यकार्यकारी अधिकारी जी प बुलढाणा यांच्या समोर डोणगाव ग्रामपंचायत मधील कागद पत्राबद्दल व दप्तर बद्दल प्रश्न उपस्थित केला असता तेथे उपस्थित असलेले विस्तार अधिकारी गवई यांनी एक शब्दही न बोलल्याने ग्रामपंचायत मधील दप्तर हजर नसल्याच्या शैलेश सावजी यांच्या आरोपाला दुजोरा दिला.

त्याने मुख्यकार्यकारी अधिकारी यांनी 11 नव्हेंबर रोजी दप्तर तपासणी साठी विस्तार अधिकारी जे जे आरु व एस बी पंडागळे यांना पाठवले मात्र त्यांनी थोड्याच वेळात दप्तर न तपासता पळ काढला त्याने संतप्त मागणी कर्ते शैलेश सावजी व शेक अय्युप यांनी ग्रामपंचायत मध्ये मुक्काम ठोको आंदोलन सुरु केले तेही ऐन दिवाळीत. त्यामुळे तालुक्यात चर्चेचा विषय ठरला आहे.

 

ग्रामपंचायत मधील दप्तर हे हजर नसल्यानेच तपासणी करण्यासाठी आलेल्या अधिकाऱ्यांनी दप्तर तपासणी न करताच पळ काढला ही बाब संवेदनशील असून हे कर्मचारी डोणगाव ग्रामपंचायत ची फाटलेली लंगोट झाकन्या साठी मुख्यकार्यकारी अधिकारी यांच्या आदेशाला सुद्धा जुमानत नसल्याचे दिसून येते -शैलेश सावजी )

ताज्या बातम्या

ताज्या बातम्या