spot_img

समृद्धीवर व्हिडिओ पाहत वाहन चालविणाऱ्या लक्झरी चालकावर गुन्हा दाखल.. बुलढाण्यातील उपप्रादेशिक परिवहन अधिकार यांची कारवाई ….

 

मेहकर (अनिल मंजुळकर रोखठोक न्यूज वृत्त सेवा)

15 ऑक्टोंबर रोजी पुणे ते नागपूर एक खाजगी स्लीपर बसचा चालक समृद्धी महामार्गावर मोबाईल मध्ये व्हिडिओ पाहत वाहन चालवत असल्याचा व्हिडिओ सोशल मीडियात व्हायरल झाला होता. यानंतर संपूर्ण राज्यात एकच खळबळ माजली होती .

कारण अनेक बळी या समृद्धी महामार्गावर आज पर्यंत गेले आहे. आणि नुकताच एक खाजगी बस चा अपघात. यामध्ये बारा जणांचा बळी गेले. हे प्रकरण ताजे असताना असे व्हायरल व्हिडिओ समोर येणे निश्चित गंभीर बाब म्हणावी लागेल..याची दखल घेत बुलढाणा उप प्रादेशिक विभागाच्या वतीने वाहन चालकाची ओळख पटुन वाहन चालकावर आज मेहकर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

समृद्धी महामार्गावर बस चालवत असताना व्हिडिओ बघणाऱ्या बस चालकावर मेहकर पोलिसात गुन्हा दाखल.
उप प्रादेशिक परिवहन अधिकारी श्रीमती अनुजा सुभाष काळमेघ बुलढाणा यांच्या तक्रारी वरून धनंजय कुमार सिंह रा. काजुपाडा , बोईसर मुंबई या बस चालकावर गुन्हा दाखल केला आहे

धनंजय कुमार हा अती वेगाने बस चालवत असताना व्हिडिओ बघत असल्याने प्रवाश्यांच्या जीवाशी खेळत असल्याचा व्हिडिओ आला होता समोर.

चालकावर कडक कारवाई करण्यात येणार असल्याची उप प्रादेशिक परिवहन अधिकारी यांची माहिती पुढील तपास पि.आय.राजेश शिंगटे करीत आहे

ताज्या बातम्या

ताज्या बातम्या