वडिलांच्या पावलावर पाऊल ठेवून समाजहित जोपासणारी नवदुर्गा माधुरी देवानंद पवार सर्वच क्षेत्रात महिलांची दमदार कामगिरी पार पडत आहे. सामाजिक क्षेत्राबरोबरच महाआरोग्य शिबिर माध्यमातून अनेकांची सेवा करण्यात धन्यता मानत सहकार क्षेत्रात नावलौकिक मिळविला आहे.
नवरात्रात स्त्री शक्तीचा जागर चालू असताना आपल्या सकारात्मक नियोजनातून सप्तशृंगी बँकेला उच्च शिखरावर नेऊन ठेवणाऱ्या ॲड. माधुरीताई यांचा आज वाढदिवस म्हणजे योगायोग…..
“कबुतराला गरुडाचे पंख लावता ही येतील पण गगन भरारीचे वेड हे रक्तातच असावं लागतं कारण आकाशाची ओढ दत्तक घेता येत नाही . आपल्या वडीलाचा समाजसेवेचा वारसा नेटाने जोपासत एक एक पाऊल पुढे टाकत आपली एक वेगळी ओळख निर्माण करणाऱ्या माधुरीताई खऱ्या अर्थाने नवशक्तीचे एक रूप म्हणून समोर येत आहेत. सप्तशृंगी महिला अर्बन बँकेच्या अध्यक्षा ॲड कु.माधुरीताई देवानंद पवार यांच्या कार्यकर्तृत्वाचा हा चढालेख वडीलाची परिस्थिती सोबतचा संघर्ष पाहता पाहता मोठया झालेल्या माधुरीताईने आपले शिक्षण जिल्हा परिषद मराठी प्राथमिक शाळा हिवरा खुर्द या ठिकाणी व माध्यमिक शिक्षण हे प्राध्यापक एन डी पाटील माध्यमिक विद्यालय या ठिकाणी पूर्ण केले.
व पदवीसाठी त्या गोसे महाविद्यालय खामगाव येथे गेल्या बीएससी पूर्ण करून टिळक महाराष्ट्र विद्यापीठ पुणे येथे त्यांनी एमए केले परंतु सामाजिक क्षेत्रामध्ये काम करत असताना काहीतरी करण्याची उमेद त्यांना स्वस्थ बसू देत नव्हती.महाविद्यालयामध्ये ,शाळेमध्ये विविध उपक्रम राबवून पर्यावरण संवर्धनाचे आणि महिला सक्षमीकरणाचे काम त्या सतत करत आहेत. गो.से. महाविद्यालय खामगाव येथे शिकत असताना महिला सक्षमीकरणाच्या अंतर्गत जवळपास २००० महिला व विद्यार्थिनींना कचऱ्यातून कला या विषयाचे प्रशिक्षण त्यांनी दिले. प्लास्टिक निर्मूलन सारखी गंभीर समस्या हाताळत असताना ५००० प्लास्टिक पिशवीचा पुनर्वापर कशा प्रकारे करता येईल? हे दाखवून दिले एनएनएस च्या माध्यमातून बुलढाणा जिल्ह्याचे नेतृत्व २०१८ मध्ये आव्हान कॅम्प मध्ये त्यांनी केले.
शिक्षण घेत घेत सामाजिकता जपण्याचं काम त्यांच्या माध्यमातून सातत्याने होत आलेलं आहे. घरामध्ये लोकसेवेची परंपरा ,प्रचंड गरिबी अनुभवल्यानंतर कुठेतरी स्थिरस्थावर होत असताना समाजाला आपण काहीतरी देणं लागतो या उदात्त भावनेमधून त्या विविध सामाजिक उपक्रम राबवत आहेत. सप्तशृंगी महिला अर्बन को ऑफ क्रेडिट सोसायटी मर्यादित मेहकर मुख्यालय जानेफळ अध्यक्षा म्हणून ११ फेब्रुवारी २०२२ रोजी त्यांची निवड झाली.
महिलांसाठी महाविद्यालयीन मुलींसाठी सॅनिटरी पॅड व्हेडिंग आणि डिस्पोजल मशीन चे संस्थेच्या माध्यमातून वाटप करण्यात आले मेहकर येथील दोन महाविद्यालयात, श्री सरस्वती महाविद्यालय जानेफळ या ठिकाणी त्या मशीन्स देण्यात आल्या. महाविद्यालयीन मुलींचे प्रश्न आणि त्यांच्यावर काय उपाययोजना करावी याचं जाण ताईंना असल्यामुळे त्यांच्या माध्यमातून महाविद्यालयीन मुलींचे प्रश्न सोडवण्यासाठी त्यांनी पुढाकार घेतला .
संस्थेच्या माध्यमातून महाआरोग्य शिबिर राबविण्यात आले . प्रचंड प्रतिसाद परिसरातून मिळाला .जवळपास सात हजार रुग्णांची सेवा करण्याची संधी यावेळेस मिळाली. रुग्ण सेवा हिच ईश्वर सेवा अंगिकारले व महाआरोग्य शिबिराच्या माध्यमातून रुग्णांना आपलंसं करणाऱ्या ॲड.माधुरीताई यांच्यामध्ये प्रत्येकांना आपली मुलगी भासू लागली.
सामाजिकच नव्हे तर सहकार क्षेत्रामधील त्यांचे योगदान खूप मोठे आहे.
बँकेच्या अध्यक्षा म्हणून आपला पदभार घेतल्यानंतर ठेवीमध्ये जवळपास १३कोटींची वाढ मार्च २०२२ पासून ते सप्टेंबर २०२३ पर्यंत त्यांनी अतिशय कुशल तेने घडवून आणली .शिक्षण घेत असताना देखील या सर्वांवर आपलं लक्ष ठेवत उत्कृष्ट कार्य करणाऱ्या कर्मचारी वर्गाचा सन्मान व्हावा त्यांच्या पाठीवर कुठेतरी कौतुकाची थाप मिळावी म्हणून त्यांनी कर्मचारी सन्मान पुरस्काराची सुरुवात केली. २१००रुपये रोख रक्कम तथा .
सन्मानपत्र अशा स्वरूपाचा हा पुरस्कार त्यांच्या माध्यमातून बँकेच्या कर्मचाऱ्यांना देण्यात येतो. मुलींमधल्या सुप्त गुणांना वाव मिळावा म्हणून सांस्कृतिक स्पर्धा ,रांगोळी स्पर्धेचे आयोजन आणि त्यात सहभागी झालेल्या सर्वच सहभागी स्पर्धकांना भेटवस्तू वाटप असा उपक्रम राबवतात.
संस्थेच्या माध्यमातून दरवर्षी परिसरामध्ये जनसामान्यांचे प्रश्न ऐरणीवर मांडणाऱ्या पत्रकार बांधवांचा सत्कार त्या घेतात माणूस जिवंत असताना सेवा करत असताना मेल्यानंतरही सुद्धा त्यांचा स्मशान भूमी पर्यंतचा प्रवास सुखकर व्हावा म्हणून दोन स्वर्ग रथ संस्थेच्या माध्यमातून कार्यरत आहेत मेहकर शहर आणि मेहकर ग्रामीण अशा दोन्ही ठिकाणी हे स्वर्ग रथ आज सुद्धा कार्यरत असताना आपल्याला दिसून येतात .रक्षाबंधनच्या सणा निमित्ताने परिसरात जवळपास एक लाख राखींच वाटप त्यांनी सातत्याने केलेले आहे.
सप्तशृंगी महिला अर्बन चा विकास झपाट्याने होत आहे .जानेफळ, हिवरा खुर्द ,ईसोली, मंगरूळ नवघरे ,उदयनगर घाटबोरी पांगरखेड ,वेणी, अंजनी बुद्रुक आणि मेहकर अशा ठिकाणी संस्थेचा विस्तार झालेला आहे जवळपास दहा शाखेच्या माध्यमातून ही सहकाराची पाळेमुळे वाढत आहेत .लोकांच्या आर्थिक समस्या दूर करत असताना कुठेतरी एखाद्या अपघातग्रस्त कुटुंबाला सुद्धा आपला हातभार लागला पाहिजे या उदात्त विचारातूनच वेगवेगळ्या ठिकाणी आपत्तीग्रस्त झालेल्या कुटुंबांना त्यांनी मदत केलेली दिसून येते.
पाथर्डी या ठिकाणी आग लागून घर नेस्तनाभूत झालेलेअसताना आणि ते कुटुंब उघड्यावर आले असताना तातडीने त्या ठिकाणी जाऊन त्या कुटुंबाला दहा टिनाची मदत संस्थेच्या माध्यमातून त्यांनी केली. हिवरा खुर्द या ठिकाणी सुद्धा आग लागून घर जळालेले असताना त्या कुटुंबाला सावरण्यासाठी दहा टिनांची मदत त्यांनी केली.
प्राध्यापक अनंत शेळके हिवरा आश्रम या ठिकाणी नित्यानंद नावाचा एक अनाथ आश्रम चालवतात पदरमोड करून चालवत असलेला हा अनाथ आश्रम पाहून माधुरीताई
गहीवरल्या त्यांनी जवळपास ५० हजार रुपये या संस्थेला मुलांच्या बेड साठी आणि आवश्यक असलेल्या सुविधांसाठी दिले तितकेच नाही तर सेवा संकल्प या ठिकाणी जाऊन गरजवंत रुग्णांना ब्लॅंकेट चे वाटप त्यांनी केले .
दाताळा येथील वृद्धाश्रमाला नुकतेच त्यांनी ३१लोखंडी पलंग दिलेले आहेत दातृत्वाच्या माध्यमातून कर्तुत्व घडत असतं याचे उत्तम उदाहरण म्हणजे ॲड माधुरीताई आहेत
गोरगरिबांची मुलं शासकीय सेवेत लागण्यासाठी धडपड करत असतात . परंतु कुठेतरी पैशाची कमतरता असते वेगवेगळ्या ठिकाणी खर्चिक क्लासेसला ते जाऊ शकत नाहीत म्हणून जानेफळ येथे पोलीस प्रशिक्षण केंद्रामध्ये निवासी प्रशिक्षण घेता यावं त्यामुळे जवळपास एका महिन्याचा भोजनाचा खर्च त्यांनी उचलला आणि जेवढे ही मुलं पोलीस प्रशिक्षण भरतीला येतील त्या सर्वांच्या भोजनाची जवळपास एक महिन्याची व्यवस्था त्यांनी केली
परिसरातील गुणवंत विद्यार्थ्यांना प्रोत्साहित करून त्यांच्यामधील आणखीन चांगलं बाहेर पडावं या उदात्त हेतूने गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार त्या दरवर्षी घेतात
आपलं महाविद्यालयीन शिक्षण चालू असताना कुटुंबातील समाजसेवेचा वारसा आणि एनएसएस मध्ये स्वयंसेविका म्हणून कार्य करत असताना समाजाविषयीचा आपुलकीचा दृष्टिकोन बळावल्या गेला. एनएसएस मध्ये उत्कृष्ट स्वयंसेविका म्हणून त्यांचा सन्मान तालुका पातळीवर आणि जिल्हा पातळीवर सुद्धा झालेला आहे. आव्हान एनएसएस २०१८ जिल्ह्याचे नेतृत्व करण्याची संधी त्यांना महाविद्यालयीन स्तरावर मिळाली आणि यामुळेच अमरावती विद्यापीठाचे सन्माननीय कुलगुरू यांचे हस्ते त्यांचा सत्कार तीन वेळेस झालेला आहे.
पर्यावरण आणि महिला सक्षमीकरण यासाठी महाविद्यालयाला शनिवार आणि रविवारी सुट्टीच्या वेळेमध्ये जाऊन आसपासच्या महिलांना युवतींना स्वयंरोजगाराचे धडे देत आणि त्यांना शिकवण्याचं काम त्यांनी केलेलं आहे . नेटच्या दौऱ्याच्या वेळेस विद्यार्थी फोरम मध्ये सक्रिय सहभाग घेऊन त्यांनी आपला प्रतिसाद त्या ठिकाणी नोंदवलेला आहे
सध्या ॲड माधुरीताईंचं एलएलएम चालू आहे आणि समाजसेवेचे काम सुद्धा चालू आहे नवरात्रामध्ये स्त्रीशक्तीचा जागर आणि स्त्रियांचे कर्तृत्व याविषयी सर्वत्र चर्चा होत असताना ॲड. माधुरीताईंसारखे एक युवती समोर येते आणि तिच्या कार्यकर्तृत्वाने समाजमन व्यापून टाकते योगायोगाने त्यांचा वाढदिवस नवरात्र मध्ये येतोय ही सुद्धा आनंदाची बाब वाढदिवसाच्या निमित्ताने त्यांना लाख लाख शुभेच्छा
स्त्री म्हणजे आयुष्याच्या रंगमंचावर कुठलीही तालीम न करता प्रत्येक भूमिका यशस्वीपणे पार पाडणारी आदिशक्तीचे एकरूप असते हे परत एकदा यानिमित्ताने अधोरेखित होते. हे विशेष…
रोजच्या गतीने आपला आयुष्य असणाऱ्या माधुरी ताईंचा हा प्रवास त्यांच्या कुटुंबीयांना आणि त्यांच्यासोबत चालणाऱ्यांना नक्कीच प्रेरित करत आहे.
माधुरीताई तुम्हाला
वाढदिवसाच्या मनःपूर्वक खूप खुप शुभेच्छा.