spot_img

अनुष्का मलोसे हिची सलग पाचव्यांदा राज्यस्तरीय लॉन टेनिस स्पर्धेसाठी निवड

 

मेहकर (बाळु दळवी. रोखठोक न्यूज वृत्त सेवा)

वाशीम येथे नुकत्याच झालेल्या विभागस्तरीय लॉन टेनिस स्पर्धेत जिजामाता कन्या विज्ञान महाविद्यालय मेहकर ची विद्यार्थिनी टेनिस प्रशिक्षक संदीप मलोसे यांची मुलगी अनुष्का हिची सलग पाचव्यांदा राज्यस्तरावर निवड झाली आहे. ती जिजामाता कन्या शाळेची इयत्ता बारावी शिकत आहे.

क्रीडा व युवक संचालनालय तथा वाशीम जिल्हा क्रीडा अधिकारी यांच्या संयुक्त विद्यमाने ही स्पर्धा घेण्यात आली. या स्पर्धेत वाशीम, अमरावती, अकोला, बुलडाणा आणि यवतमाळ जिल्ह्यातील विद्यार्थिनींनी सहभाग घेतला. या यशाबद्दल प्राचार्य सौ.ऊमा जोशी , प्रवेक्षक श्री ए आर चव्हान सर, शहर पत्रकार संघाचे अध्यक्ष ज्ञानदेव मानवतकर , यांनी अनुष्काचे अभिनंदन केले.

ताज्या बातम्या

ताज्या बातम्या