मेहकर (अनिल मंजुळकर. रोखठोक न्यूज वृत्त सेवा )
कलेक्टर साहेब ऍक्शन मोडवर असल्याचे दिसून येत आहे त्यांनी जिल्हा भरात आपले दौरे सुरु केलेले दिसून येते .अश्यातच ते 14 अक्टोबर रोजी मेहकर तालुक्याच्या दौऱ्यावर येऊन त्यांनी येलो मोजॅक ग्रस्त शेतकऱ्याच्या शेताची पाहणी, कोराडी प्रकल्प मस्य बीज केंद्राला भेट व शारंधर बालाजी दर्शना सहित मेहकर मधील सर्व शासकीय कार्यालयाची झाडाझडती घेतली.
सोबतच मेहकर ग्रामीण रुग्णालयाची पाहणी केली जिल्हाधिकारी यांच्या दौऱ्याची माहिती असतांना सुद्धा काही अधिकारी गैरहजर असल्याने जिल्हाधिकारी यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली तर खाजगी रुग्णालयात रुग्ण मावत नाही आणि सर्व सुविधा असल्या नंतर सुद्धा ग्रामीण रुग्णालयात रुग्ण का नाही यावर सुद्धा प्रश्न उपस्थित केल्यामुळे आरोग्य विभागाच्या गलथान कारभाराचा प्रश्न ऐरणीवर आला.
मेहकर तालुक्यात जिल्हाधिकारी यांचा दौरा असण्या बाबत मेहकर तहसीलदार यांना माहिती मिळताच त्यांनी 13 अक्टोबर रोजी मेहकर तालुक्यातील सर्व शासकीय विभागाला कळवले होते त्या नुसार मेहकर येथे पोचण्या पूर्वीच रस्त्यात असलेल्या येलो मोजॅक ग्रस्त शेतकऱ्याच्या शेतीची पाहणी केली व पंचनामे करण्याचे आदेश दिले तर पुढे जावून कोराडी प्रकल्प येथे जावून मत्स्य बीज केंद्राला भेट देऊन ज्या शेतकऱ्यांच्या कडे शेततळे आहे अश्या शेतकऱ्यांना मत्स्य शेतीसाठी प्रोत्साहित करून मत्स्य बीज वितरण करण्याच्या सूचना दिल्या त्या नंतर मेहकर तहसीलची पाहणी करून तहसील मध्ये असलेल्या जीर्ण इमारतीवर लक्ष देऊन धोकादायक स्थितीत असलेला भाग पाडण्या संबंधी सूचना दिल्या या वेळी तहसीलचे कर्मचारी तहसीलदार हे हजर होते पुढे जाताना त्यांनी एकात्मिक बालविकास प्रकल्प अधिकारी कार्यालय पहिले असता कार्यालय कुलूपबंद दिसून आले त्यावर जिल्हाधिकारी यांच्या सोबत असलेल्या अधिकाऱ्यांनी फोटो घेतले.
मेहकर येथील शाळा क्रमांक दोन मधील मतदान केंद्राला भेट देऊन त्या ठिकाणी असलेल्या मूलभूत व भौतिक सुविधेची पाहणी केली येथून पुढे जात मेहकर येथील प्रशासकीय इमारतीच्या बांधकामाची पाहणी करत बांधकाम लवकरात लवकर करण्याच्या सूचना दिल्या तसेच ठेकेदार सोबत चर्चा केली मेहकर येथील खामखेड रोडवर असलेल्या शासकीय गोडाऊनची पाहणी केली व गोडाऊनच्या रस्त्यावर असलेले अतिक्रमण काढण्याचे तहसीलदार यांना आदेशीत केले.
मेहकर येथील ट्रामा केअर सेंटर बांधकाम पाहणी, डायलेसिस युनिटच्या जागेची पाहणी केली तर मेहकर ग्रामीण रुग्णालयात जावून संपूर्ण रुग्णालया सोबतच औषध साठा व रुग्णलयात भरती असलेल्या रुग्णाची विचारपूस केली या वेळी जिल्हाधिकारी यांनी आश्चर्य व्यक्त केले की खाजगी रुग्णालया मध्ये रुग्णाला बसायला जागा नाही व मेहकर ग्रामीण रुग्णालयात रुग्ण दिसेना यावर लक्ष देण्याचे डॉक्टरांना सूचित केले . त्यामुळे आरोग्य विभाग चांगलेच धास्तावले आहेत. एवढं मात्र खरं .
गटविकास अधिकारी व प्रशासक गैरहजर
मेहकर तालुक्यातील ग्रामीण भागातील 98 ग्रामपंचायत सोबतच 147 गावाचा कारभार सांभाळणारे रघुनाथ पांढरे गट विकास अधिकारी . जिल्हाधिकारी यांनी भेट दिली असता ते गैर हजर होते तर मेहकर नगर पालिकेचे मुख्य अधिकारी तथा मेहकर नगर पालिका प्रशासक असलेले रमेश ढगे हे सुद्धा गैरसहजर होते यावर जिल्हाधिकारी यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली जर मेहकर नगर पालिकेच्या प्रशासकाचा चार्ज तहसीलदार किव्हा उपविभागीय महसूल अधिकारी यांच्याकडे असता तर निश्चितच मेहकर येथे जिल्हाधिकारी आलेले असतांना मुख्य अधिकारी हजर राहिले असते . असे बोलल्या जात आहे. त्यामुळे कलेक्टर साहेबांना मेहकर शहरातील अधिकार्यांची कामांबाबत किती जागरूकता आहे. भेटी दरम्यान समजले असेल.