मेहकर (अनिल मंजुळकर)
जानेफळ सह परिसरात सर्दी, खोकला व तापाने थैमान घातले असुन दवाखाने हाऊसफुल्ल आहेत. आणि अशातच खाजगी डॉक्टरांनी तपासणी इंजेक्शन व सलाईनचे भाव वाढविल्याने नागरिक हैराण झाले आहेत तर दुसरीकडे आतापर्यंत कोणत्याच गावांमध्ये ग्रामपंचायतीच्या वतीने फवारणी झाली नसल्याचे धक्कादायक माहिती हाती आली आहे.
जानेफळ सह परिसरातील काही रुग्णांना डेंग्यूची लक्षणे आढळल्याने उपचारासाठी औरंगाबाद येथे भरती करण्यात आल्याने एकच खळबळ उडाली आहे.
जानेफळ येथे दोन, मोसंबे वाडी, मिस्किन वाडी, गोमेधर, वरवंड , मुंदेफळ मध्ये दोन डेंग्यूचे रुग्ण आढळले आहेत. रोज तापाचे रुग्ण दवाखान्यात भरती होत आहेत परंतु उपचारानंतर तात्पुरता फरक पडून पुन्हा ताप येत असल्याचे रुग्णांचेेे नातेवाईक सांगत आहेेत. तापाची साथ जोमात सुरू असताना आरोग्य विभागाचे काम फक्त नावापुरतेच सुरू असल्याचे बोलल्या जात आहे.
शाळेतील पिण्याच्या पाण्याची टाकी तपासण्याची गरज !
शाळेतील मुलांना पाणी पिण्यासाठी वापरले जाणारे पाण्याची टाक्यांची साफसफाई केलेली आहे का? नियमित स्वच्छता ठेवण्यात येते का ? आरोग्य विभागाकडून शाळेतील पिण्याच्या पाण्याच्या टाकीची तपासणी केली जाते का? जानेफळ सारख्या शाळेत शिक्षकांना पिण्यासाठी खाजगी ॲरोचे पाणी व मुलांना बोर किंवा विहिरींचे पाणी पाजले जाते.
से
काही मुलांना घरी ॲरोचे पाणी पाजले जाते त्यामुळे कधी कधी पाण्याचा बदल होत असते. परंतु अजुन जानेफळ सह एकाही शाळेची तपासणी झाली नाही. त्यामुळे जागरूक पालकांनी लक्ष देण्याची गरज निर्माण झाली आहे. …
# *बोगस डॉक्टरसह लॅबची तपासणी कधी होणार ?* #
सध्या ताप सर्दी खोकला या आजाराने थैमान घातले आहे . शासन इतका खर्च करत असतानाही सुद्धा अधिकारी कर्मचारी बेसावधपणे वागताना दिसत आहेत. मेहकर तालुक्यात कुठेच औषध घाण पाणी फवारणी नाही.गावात असलेल्या घाण पाणी वाहून नेणाऱ्या नाल्यांची साफसफाई नसल्याने डासांचा मोठ्या प्रमाणात प्रादुर्भाव झाला असून जिकडे तिकडे गल्ली बोळात घाण साचलेली दिसत आहे.
हिवताप निर्मूलन अधिकारी कुठेच काम करताना दिसत नाहीत. यामुळे मेहकर सह तालुक्यातील बोगस डॉक्टरांची व लॅब वाल्यांची तपासणी करणे गरजेचे आहे.
सध्या डॉक्टर हे रुग्ण आल्यावर त्याची रक्त व लघवी तपासणी करायला लावतात त्याचे आलेले रिजल्ट नुसार उपचार करतात मात्र तेच पॅथोलॉजी मधील तपासणी करणारे जर बोगस असतील तर त्यातून आलेले रिजल्ट कितपत योग्य असणार असा प्रश्न निर्माण होतं आहे यावर आरोग्य विभागाने कार्यवाही करणे गरजेचे असून आता पर्यंत कोणत्याच बोगस डॉक्टरांची तपासणी झाली नाही. बोगस डॉक्टरांच्या निदानाने तालुक्यात जणता वैतागली आहे. एवढं मात्र खरे !
# *रुग्णांची गर्दी पाहून डॉक्टरांची भाव वाढ* #
तापाच्या वाढत्या साथीमुळे रुग्णांच्या गर्दीने दखाखाने हाऊसफुल्ल भरलेली असताना डॉक्टर लोकांनी मात्र अचानक तपासणी फी, इंजेक्शन व सलाईनचे भाव वाढविले आहेत तर पॅथॉलॉजी चालकांनी सुद्धा मणमाणे पैसे घेणे सुरु केले आहे.
रक्त व लघवी तपासणीची गरज असली किंवा नसली तरी डॉक्टर रक्त व लघवी तपासणीची चिठ्ठी लिहून देत तपासून घेण्याचा आग्रह करीत आहेत आणि याचा गैरफायदा घेत पॅथॉलॉजी चालक मनमानी दराने रुग्णांकडून पैसे उकळत आहेत त्यामुळे जनता हैराण झाली आहे.त्यामुळे जिल्हा आरोग्य अधिकारी यांनी याकडे गंभीरतेने लक्ष देण्याची मागणी होत आहे.