spot_img

मेहकर मतदारसंघात हौसे नवसेच्या हालचाली सुरू महाराष्ट्राच्या राजकारणात काँग्रेस एकनिष्ठ पक्ष इतर पक्षाला लागले गटबाजीचे ग्रहण

 

मेहकर (उद्धव फंगाळ रोखठोक न्यूज वृत्त सेवा )

लोकसभा व विधानसभेच्या व इतर स्थानिक संस्थांच्या निवडणुका जवळ येत आहेत निवडणुकीवर डोळा ठेवून मेहकर मतदार संघात अनेक हौसेनवश्यांच्या हालचाली सुरू झाल्याचे चित्र पाहायला मिळत आहे जनतेला वाऱ्यावर सोडून तसेच कधीही जनतेच्या संपर्कात न राहणारे फक्त निवडणुकीवर डोळा ठेवून काही हौसे नवसे मीच मेहकर मतदारसंघाचा आमदार होणार या अविर्भावात वावरताना दिसत आहेत सध्या महाराष्ट्रातील राजकारण पाहता इतर सर्वच पक्षाला गटबाजीचे ग्रहण लागले आहे

तर अनेक पक्षातील लोकप्रतिनिधी केवळ सत्तेच्या खुर्चीसाठी सरकारमध्ये सामील झाले आहेत मात्र काँग्रेस पक्ष सत्तेसाठी नव्हे तर जनहितासाठी एकनिष्ठ राहिल्याचे चित्र सुद्धा महाराष्ट्रातील जनतेला दिसून आले आहे परंतु मेहकर मतदारसंघात काँग्रेस पक्षातही एकजूट आहे असे फक्त दाखविल्या जात आहे अंतर्गत चढाओढ मात्र सुरूच आहे लोकसभा विधानसभा नगरपालिका व इतर निवडणुका या अवघ्या काही महिन्यात सुरू होत असल्याचे वातावरण पाहायला मिळत आहे

त्या दृष्टीने सर्वच राजकीय पक्षाकडून मेहकर मतदार संघात हालचाली सुरू असल्याचे चित्र दिसत आहे विधानसभेची निवडणूक लढविण्यासाठी विविध पक्षाकडून हवसे नवसे तयार होत असल्याचे चित्र दिसून येत आहे मात्र हे सर्व होत असताना काँग्रेसच एक पक्ष आहे की या पक्षात महाराष्ट्रात गटबाजी म्हणजेच हा पक्ष सत्तेसाठी फुटलेला नाही इतर जवळपास 70 टक्के पक्ष हे सत्तेसाठी फुटलेले दिसून आले आहे मेहकर मतदार संघात शिवसेनेमध्ये व राष्ट्रवादीमध्ये उघडपणे दोन गट पडले आहेत तर मेहकर शहरात भाजपमध्ये सुद्धा दोन गट असल्याचे दिसून आले आहे

त्यामुळे येत्या विधानसभा निवडणुकीत जनतेला मात्र अनेक उमेदवार यांचे चेहरे पाहायला मिळणार आहेत जनता जनार्दन मात्र आता हुशार झाले असून भावनेच्या भरात किंवा जातीपातीच्या राजकारणावर न जाता सक्षम उमेदवार व नेहमी जनतेच्या संपर्कात राहणाऱ्या उमेदवारालाच सहकार्य करतील असे चित्र तरी सध्या दिसून येत आहे चार-पाच दिवसांपूर्वी भाजपचे नवनियुक्त जिल्हाध्यक्ष यांनी भाजपच्या एका कार्यक्रमाचे आयोजन मेहकर येथे केले होते नवनियुक्त जिल्हाध्यक्ष यांचा पहिलाच कार्यक्रम मेहकर येथे असताना भाजपमध्ये उघडपणे दोन गट दिसून आले भाजप पक्षाला मेहकर मध्ये युती असताना कधीही शिवसेनेकडून मान सन्मानाची वागणूक मिळालेली नाही भाजपमध्ये कार्यकर्ते व मतदारांची कमतरता असली तरी तुरळक प्रमाणात नेते मंडळीच दिसून येत आहे

भाजपचे नवनियुक्त जिल्हाध्यक्ष यांनी भाजपच्या सर्व लोकांना एकत्रित करून कार्यक्रम घ्यायला पाहिजे होता मात्र ज्या भाजप पदाधिकाऱ्यांनी मेहकर लोणार व मेहकर मतदार संघात सुरुवातीपासून भाजप जिवंत ठेवली भाजपाची ध्येयधोरण शेवटच्या घटकापर्यंत पोहोचवली अशा जुन्या लोकांना डावल्यामुळे भाजपमध्ये उलट सुलट चर्चेला उधाण आले आहे तर काँग्रेस पक्ष हा सुरुवातीपासूनच आपल्या ध्येयधोरणावर वाटचाल करीत आहे महाराष्ट्रामध्ये सत्तेच्या खुर्चीसाठी अलीकडच्या काळात अनेक घडामोडी घडल्या मात्र काँग्रेस पक्ष आपल्या भूमिकेवर ठाम राहिला

शिवसेनेमध्ये दोन गट पडले आहेत तर राष्ट्रवादीमध्ये सुद्धा दोन गट उघडपणे झाले आहेत शिवसेनेची ताकद मेहकर मतदार संघात चांगली आहे मात्र त्या उलट राष्ट्रवादी नाममात्र असल्याचे चित्र दिसून येत आहे काहीही असले तरी सध्याच्या परिस्थितीत मेहकर मतदार संघाची निवडणूक लढविण्यासाठी अनेक हवसे नवसे हालचाल करत असल्याचे दिसून येत आहे

ताज्या बातम्या

ताज्या बातम्या