मेहकर (उध्दव फंगाळ . रोखठोक न्यूज वृत्त सेवा )
शारंगधर नगरी मेहकर येथे श्री भगवान बालाजीची सर्वात मोठी मूर्ती आहे इतिहासकालीन हे बालाजीचे मंदिर मेहकर येथे आहे महाराष्ट्रासह महाराष्ट्राच्या बाहेरूनही भाविक भक्त मोठ्या प्रमाणात दर्शनासाठी बालाजी मंदिरात येत असतात तर मेहकर व ग्रामीण भागातील भावी भक्त सुद्धा दररोज दर्शनासाठी बालाजी मंदिरात जात असतात मात्र बालाजी मंदिरात जात असताना आठवडी बाजारातून जो रस्ता आहे तो रस्ता अतिक्रमणामुळे अरुंद झालेला आहे तर याच रस्त्यावर उघड्यावर मास विक्री गेल्या अनेक वर्षापासून मोठ्या प्रमाणात सुरू आहे त्यामुळे याचा त्रास भाविकांना नेहमीच होत आहे
शहरवासीयांनी विविध धार्मिक संघटनांनी नगरपालिकेकडे पोलीस विभागाकडे व तहसीलदाराकडे या अगोदरही लोकशाही मार्गाने व नियमानुसार तक्रारी केलेल्या आहेत मात्र नगरपालिकेकडून नेहमीप्रमाणे थातूरमातूर कारवाई करण्यात येते मात्र परिस्थिती पुन्हा जैसे थेच होते मात्र सध्या उघड्यावर होणारी मास विक्री ,अतिक्रमण या मुद्द्यासाठी मेहकर शहरातील बालाजी मंदिर संस्थांचे अध्यक्ष व इतर सामाजिक कार्यकर्त्यांनी महात्मा गांधी जयंती पासून नगरपालिकेसमोर लोकशाही मार्गाने उपोषण सुरू केले आहे
या उपोषणाला मेहकर शहरातून अगदी पहिल्या दिवसापासून प्रचंड प्रतिसाद मिळत आहे अनेक भाविक भक्त नागरिक महिलावर्ग मोठ्या प्रमाणात या उपोषणाला पाठिंबा देताना दिसत आहेत मात्र तीन दिवस होऊनही संबंधी शासन व प्रशासनाकडून कोणतीच गंभीर दखल या उपोषणाची घेतल्याचे दिसून येत नाही त्यामुळे नगरपालिका अधिकाऱ्यांची यासंदर्भात संबंधित मास विक्री करणाऱ्या सोबत हितसंबंध आहेत की काय असा प्रश्न उपस्थित होत आहे उघड्यावर मास विक्रीचा परवाना आहे का परवाना नसेल तर मग नगरपालिका ठोस कारवाई का करत नाही असाही प्रश्न उपस्थित होत आहे
नगरपालिकेच्या वतीने मास विक्रीसाठी स्वतंत्र गाळे बांधून देण्यात आलेले आहे यासाठी कोट्यावधी रुपये खर्च करण्यात आले आहेत मात्र या गाळ्यांमध्ये एकही मटण विक्रेता आपली मटणाची दुकाने लावत नाहीत मग याला नगरपालिका जबाबदार नाही का नगरपालिकेच्या बेजबाबदारपणामुळे शासनाचे कोट्यावधी रुपये वाया गेले आहेत मग कारवाई न करणाऱ्या अधिकाऱ्याकडून वरिष्ठ अधिकारी वसुली करणार का किंवा कारवाईस हलगर्जीपणा करणाऱ्या अधिकाऱ्यावर वरिष्ठ पातळीवरून कारवाई होणार का असे अनेक प्रश्न सध्या उपस्थित होत आहे
मात्र काहीही असले तरी उघड्यावर मास विक्री बंद करा यासाठी सुरू असलेल्या उपोषणाला दिवसेंदिवस वाढता पाठिंबा मिळताना दिसत आहे तर विविध राजकीय पक्षाकडूनही मोठ्या प्रमाणात पाठिंबा देण्यात येत आहे मात्र शासन व प्रशासनाकडून अद्याप पर्यंत कोणतीच गंभीर दखल घेतल्याचे दिसून आले नाही
लोकप्रतिनिधी गप्प का ?
भाविक भक्तांचा ज्वलंत प्रश्न असलेला उघड्यावर मास विक्री बंद करा अतिक्रमण काढा व इतर मागण्यासाठी नगरपालिकेसमोर उपोषण सुरू आहे या उपोषण संदर्भात लोकप्रतिनिधींनी सुद्धा अद्याप पर्यंत कोणतीच हालचाल केल्याचे दिसून आले नाही नगरपालिकेचे माजी नगराध्यक्ष माजी उपाध्यक्ष माजी नगरसेवक यांच्याकडूनही नगरपालिकेला धारेवर धरण्यात आल्याचे दिसून आलेले नाही त्यामुळे शहरवासीय मध्ये संतापाची लाट हळूहळू उसळत असल्याचे चित्र सध्यातरी दिसून येत आहे आता जिल्हास्तरावर काहीतरी हालचाली होण्यासाठी वरिष्ठांनी पावले उचलावीत एवढे मात्र नक्की