spot_img

सात महिन्यापासुन फरार आरोपीच्या मेहकर पोलिसांनी मुसक्या आवळल्या…. अखेर अल्पवयीन मुलीस फुस लावुन पळवणार्‍या एकास पोलिसांनी केली अटक पास्को कायद्याअंतर्गत गुन्हा नोंद

 

मेहकर:-(अनिल मंजुळकर.रोकठोक वृत्त सेवा)

एका अल्पवयीन मुलीस फुस लावुन पळवणार्‍या एकाच्या अखेर मेहकर पोलिसांनी मुसक्या आवळल्या असुन सदर आरोपीवर पाॅस्को कायद्याअंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.

दिनांक 24/03/2023 रोजी मेहकर पोलीस स्टेशन येथे अल्पवयीन मुलीस फुस लावुन पळवून नेणारा संशयित इसमा विरूद्ध अपराध क्रमांक 158/2023 कलम 363 भारतीय दंड संहिताप्रमाणे गुन्हा दाखल झाला होता व मेहकर येथील राहणारा यासिन शेख अब्दुल हमीद राहणार घरकुल,

जानेफळ रोड मेहकर याचेवर संशय होता. तब्बल 7 महिने फरार असलेला व अल्पवयीन मुलीस फुस लावुन पळवून नेणारा आरोपी यासिन शेख अब्दुल हमीद राहणार मेहकर याचा व पिडीत मुलीचा तपास अधिकारी सम्राट ब्राम्हणे पोलीस उपनिरीक्षक यांनी शोध घेतला असता मिळुन आल्याने सदर आरोपी वर कलम 376,376 (2)(n) भारतीय दंड संहिता सह कलम 4,8,12 बालकांचे लैंगिक अपराधापासून सरंक्षण अधिनियम 2012अन्वये वाढ करण्यात येवून अटक करण्यात आलेली आहे पुढील तपास सम्राट ब्राम्हणे करीत आहेत सदर कार्यवाही पोलीस अधीक्षक, सुनील कडासने.अपर पोलीस अधीक्षक बि बि महामुनी ,उपविभागीय पोलिस अधिकारी प्रदीप पाटील , ठाणेदार राजेश शिंगटे. यांचे मार्गदर्शाखाली करण्यात आलेली आहे

ताज्या बातम्या

ताज्या बातम्या