मेहकर.(अनिल मंजुळकर. रोखठोक न्यूज वृत्त सेवा )
कार्यक्रमाची सुरुवात महात्मा गांधी यांच्या जयंती निमित्त नगर पालिका येथील महात्मा गांधींच्या पुतळ्याला हार अर्पण करून सुरुवात करण्यात आली तसेच होऊ दया चर्चा या कार्यक्रमाचे उद्घाटन प्रा .आशिष भाऊ रहाटे . किशोर भाऊ गारोळे. निंबाजी पांडव एन ए.बळी.यांनी नारळ फोडून उद्घाटन केले
कार्यक्रमाचे प्रास्ताविक व कार्यक्रमाचे मुद्दे ॲड. आकाश घोडे यांनी मांडले तसेच एन ए.बळी यांनी महागाई बद्दल केंद्र सरकारच्या योजनेचा भांडा फोड केला किशोर भाऊ गारोळे यांनी सुद्धा मेहकर शहरातील विविध समस्यांवर लक्ष वेधले व आपल्या भाषणात महागाई व बेरोजगारी याबद्दल विचार मांडले
अध्यक्ष भाषणामध्ये प्राध्यापक आशिष भाऊ रहाटे यांनी 2014 च्या निवडणुकीत मोदी सरकारने जी आश्वासन दिली ती फक्त आश्वासन असून पेट्रोल डिझेल गॅस सिलेंडर व बेरोजगारी या समस्यांचा पाढा वाचला व भाजप मोदी सरकारचा कडाडून विरोध केला व आपल्या भाषणातून त्यांनी बीएसएनएल सेवा एम टी एन एल सेवा रेल्वे सेवा विमान सेवा खाजगीकरण करण्यात आले यावर सुद्धा त्यांनी जनतेसमोर मोदी सरकारने जी फसवीगिरी केली. त्याबद्दल होऊ द्या चर्चा या माध्यमातूनप्रश्न जनतेसमोर मांडले
यावेळी प्रा आशिष रहाटे, उपजिल्हाप्रमुख किशोर गारोळे
शहर प्रमुख, निंबाजी पांडव
तालुका प्रमुख,ॲड आकाश घोडे युवा सेना तालुका प्रमुख, ऋषी जगताप युवा सेना शहर प्रमुख,
ॲड संदिप गवई,एन ए बळी,
रमेश देशमुख, साहेबराव हिवाळे,
विलास शिंदे,विनोद बोरे,गणेश गावंडे,संदीप काळे,महादेव पाखरे,
पवन गाडे,मंगेश चव्हाण,गजानन निकस,किसन पाटील,सदाशिव शेळके,बबन रहाटे,गोपाल गायकवाड,माधवराव रहाटे,विजय मेटांगळे,शरद राजगुरू,प्रल्हाद राजगुरू,प्रल्हाद थोरात,पंजाब शिलार,शेख खलील,शुभम पानखडे,महेश गायकवाड,अमोल मोरे, गणेश बाजड यांचेसह शेकडो कार्यकर्ते उपस्थित होते कार्यक्रमाचे
संचालक ॲड संदिप गवई यांनी केले तर आभार प्रदर्शन निंबाजी पांडव यांनी केले