बुलढाणा : (अनिल मंजुळकर. रोखठोक न्यूज वृत्त सेवा)
राजर्षी शाहू मल्टिस्टेट को-ऑप. क्रेडिट सोसायटीच्यावतीने वर्षभर संपूर्ण जिल्ह्यात आर्थिक साक्षरता अभियान राबविण्यात येणार आहे. सुरुवातीच्या टप्प्यात ३० सप्टेंबर ते १४ ऑक्टोबर या कालावधीत अभियानादरम्यान मार्गदर्शन करण्यात येईल. आर्थिक विषयाचे तज्ञ तुषार डोडिया मार्गदर्शन करणार आहेत.
संस्थापक अध्यक्ष संदीपदादा शेळके यांच्या संकल्पनेतून आणि अध्यक्ष मालतीताई शेळके यांच्या मार्गदर्शनात जिल्ह्यात वर्षभर हे आर्थिक साक्षरता अभियान राबविण्यात येत आहे. सुरुवातीच्या टप्प्यात शनिवारी ३० सप्टेंबर रोजी येरळी येथे संध्याकाळी साडेसात वाजता या अभियानाचा शुभारंभ होईल. तर ४ ऑक्टोबर रोजी पलसोडा, ७ ऑक्टोबर गोळेगाव पांडे, ११ ऑक्टोबर भोटा आणि १४ ऑक्टोबर रोजी हिंगणा खवली येथे आर्थिक साक्षरता अभियान मार्गदर्शन होणार आहे.
आर्थिक साक्षरता काळाची गरज आहे. आर्थिक साक्षरता म्हणजे पैशाला समजावून घेणे. पैशांचे नियोजन करणे महत्वाचे आहे. फायदेशीर गुंतवणूक कोणती, मालमत्ता, सोने, मुच्युअल फंड, शेअर मार्केट याबाबत ज्ञान आवश्यक आहे. सामान्य माणसाने आर्थिक साक्षरतेबद्दल शिकायला सुरुवात केली तरच श्रीमंत आणि गरीब यांच्यामधील दरी कमी व्हायला सुरुवात होईल. यासाठी राजर्षी शाहू मल्टिस्टेट को-ऑप. क्रेडिट सोसायटीने आर्थिक साक्षरता अभियान सुरु केले आहे. प्रसिद्ध आर्थिक विषयाचे तज्ञ तुषार डोडिया मार्गदर्शन करणार आहेत. या सुवर्णसंधीचा लाभ घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे.