-राज्यभरातून केवळ 25 जण समाविष्ट, व्हॉईस ऑफ मीडिया साप्ताहिक विंगच्या प्रदेशाध्यक्ष पदाचीही सांभाळतात जबाबदारी
मेहकर (अनिल मंजुळकर.रोकठोक न्यूज वृत्त सेवा)
देशभरात गाजत असलेली व्हॉईस ऑफ मीडिया ही पत्रकारांची संघटना सगळीकडे नावारुपाला आली आहे. या संघटनेच्या 23 पेक्षा अधिक विंग आहेत. त्या संपूर्ण देशभरात कार्यरत आहेत. व्हॉईस ऑफ मीडिया संघटनेचे संस्थापक अध्यक्ष संदीप काळे यांनी हरहुन्नरी अन् सकारात्मक पत्रकारांची देशभरात मोठी टीम बनविली आहे. व्हॉईस ऑफ मीडिया साप्ताहिक विंगच्या प्रदेशाध्यक्षपदाची जबाबदारी लेखक तथा संपादक असलेले विनोद बोरे यांच्यावर सोपवून सात महिने झाले आहेत. विनोद बोरे यांनी महाराष्ट्रभरातील साप्ताहिक पत्रकारांची मोठी टीम बनविली आहे.
व्हॉईस ऑफ मीडियाचे संस्थापक अध्यक्ष संदीप काळे, व्हॉईस ऑफ मीडियाचे प्रदेशाध्यक्ष अनिल म्हस्के यांच्या मार्गदर्शनात त्यांनी छत्रपती संभाजीनगर येथे व्हॉईस ऑफ मीडिया साप्ताहिक विंगचे अधिवेशन देखिल घेतले. त्यांच्या कार्याची दखल घेऊन व्हॉईस ऑफ मीडियाच्या कोअर टीममध्ये देखिल विनोद बोरेंचा समावेश करण्यात आला आहे. या कोअर टीममध्ये व्हॉईस ऑफ मीडियाचे प्रदेशाध्यक्ष अनिल म्हस्के, विलास बढे, फराह खान, सुरेश ठमके, राजश्री आगाम, ज्ञानेश्वर चौतमल, जयपाल गायकवाड, प्रविण कोळआपटे, अरुण ठोंबरे, सचिन मोहिते, अजित कुकूलोळ, विजय चोरडीया, चेतन कात्रे, गजानन देशमुख, हुंकार बनसोडे, बालाजी मारगुडे, मंगेश खाटीक, संजय पडोळे, अरुण जैन, संजय राठोड,इरफान सय्यद,सुरेश उज्जेनवाल, भूषण अहिरे आदींचा महाराष्ट्र कोअर टीममध्ये समावेश आहे.
विनोद बोरेंना या कारणाने दिली व्हॉईस ऑफ मीडियामध्ये मोठी जबाबदारी….
विनोद बोरेंनी आतापर्यंत दहा पुस्तकं प्रकाशित केले आहेत. मोठमोठे प्रकाशन सोहळे घेतले आहेत. देशोन्नतीच्या मुख्य कार्यालयात ते उपसंपादक पदावर अगदी पाच वर्ष होते. त्यानंतर दैनिक सकाळमध्ये तीन वर्ष उपसंपादक राहिले आहेत. मराठा सेवा संघाच्या वीर भगतसिंग परिषदेच्या राष्ट्रीय कार्यकारिणीमध्ये देखिल त्यांनी काम केले आहे. वीर भगतसिंग परिषदेचे ते राष्ट्रीय कार्याध्यक्ष राहिले आहेत. विशेष म्हणजे, त्यांनी स्वत:च्या बळावर जनस्वप्नपूर्ती मीडियाची स्थापना करुन अल्पवाधितच जनस्वप्नपूर्ती हा लोकांच्या काळजात उतरविला आहे.
अनेक विशेष प्रतिनिधींची नेमणूकदेखिल त्यांनी केली आहे. महाराष्ट्रात मोठे नेटवर्क त्यांनी उभे केले आहे. विविध पुस्तकांच्या माध्यमातून 171 लोकांचा इतिहास त्यांनी लिहिलेला आहे. प्रबळ इच्छाशक्ती, जिद्द अन् मेहनतीच्या बळावर उभे केलेले काम पाहता विनोद बोरेंना व्हॉईस ऑफ मीडिया या संघटनेच्या कोअर टीममध्ये घेतले आहे. व्हॉईस ऑफ मीडिया साप्ताहिक विंगच्या प्रदेशाध्यक्षपदी त्यांची निवड केली आहे. असे असले तरी विनोद बोरे यांनी त्यांच्या पदाचा कुठेही गाजावाला केला नाही. दुसऱ्यांनाही करायला लावला नाही, हेच तर विनोद बोरेंचे वैशिष्ट्य आहे. केवळ कामावर लक्ष देणे त्यांना आवडते. त्यामुळेच त्यांना विविध पदांवर काम करण्याची संधी दिली जात आहे.