spot_img

भाजपाचे मेहकरात दोन गट पडल्यामुळे भाजपाचे वरिष्ठ नेत्यांना पेच , कोणत्या कार्यक्रमाला हजेरी लावु . कारण हि तसेच …….  भाजपची सुरुवातच वादाच्या भोवऱ्यात !

 

मेहकर (अनिल मंजुळकर . रोखठोक न्यूज वृत्त सेवा)

 

लवकरच येऊ घातलेल्या स्थानिक स्वराज्य संस्था तसेच लोकसभा विधानसभेच्या तयारीच्या हिशोबाने महाविजय 2024 या कार्यक्रमांतर्गत मेहकर मतदार संघातील “सुपर १००” पदाधिकारी व बूथ प्रमुख यांचा आढावा बैठक व मार्गदर्शनाचा कार्यक्रम काल दिनांक 29 सप्टेंबर 2023 रोजी वृंदावन लॉन व एम एस हायस्कूल येथे दोन ठिकाणी भाजपाचे कार्यक्रम पार पडल्या मुळे कार्यकर्ते संभ्रमात पडले .

वृंदावन लॉन्स येथे भारतीय जनता पार्टीचे राज्य संघटन मंत्री उपेंद्रजी कोठेकर, मा. आ. चैनसुखजी संचेती, लोकसभा निवडणूक प्रमुख मा.आ. विजयराज शिंदे, जिल्हा अध्यक्ष डॉ. गणेशजी मांटे साहेब, जिल्हा संघटक संतोष बापू देशमुख, प्रदेश कार्यकारिणी सदस्य डॉ. प्रशांतजी राठोड, विधानसभा प्रमुख प्रा. प्रकाश गवई, जिल्हा उपाध्यक्ष अर्जुनराव वानखेडे, जिल्हा सरचिटणीस गजानन घुले, जिल्हा सचिव योगेशजी सावंत, विधानसभा संयोजक सुनीलजी शेवाळे, जिल्हा उपाध्यक्ष शिवाजीराव सानप, जिल्हा सचिव गजाननजी मापारी या मान्यवराच्या उपस्थितीत २५-मेहकर विधानसभा मतदारसंघातील सर्व बुधप्रमुखांना संबोधित करण्यात आले. या कार्यक्रमाचे आयोजन सारंग माळेकर, सुभाष नरवाडे, रजनीकांत कांबळे, विलास परमाळे, गजानन नागोलकर, शिवशंकर मगर, प्रविण पऱ्हाड यांनी अतिशय उत्तम रित्या पार पाडले.

व एम एस हायस्कूल मध्ये पार पडलेल्या कार्यक्रमांमध्ये माजी. भाजपा तालुकाध्यक्ष अँड शिव ठाकरे, मंदाकिनी कंकाळ, व इतर एक दोन नेते हजर होते. या संपूर्ण कार्यक्रमांमुळे सत्तेत असणार्या भाजपाची खिल्ली उडवत असल्यामुळे मेहकर दिवसभर चर्चेत होते. यासाठी भाजपचे वरिष्ठ नेते कोणत्या गटाला तोंडसुख देणार हे सुद्धा पहावें लागणार आहे.

…….म्हणून प्रतापराव जाधवांनी तिकीट दिले नाही का. ?

कृषी उत्पन्न बाजार समिती मेहकर येथील काही दिवसा अगोदर निवडणुका पार पडल्या. या निवडणुकीत खासदार प्रतापराव जाधवांनी शेवट पर्यंत भाजपाला जागा देतोय म्हटले होते.

पण ऐनवेळी प्रतापरावांनी भाजपाला एक हि जागा दिली नसल्यामुळे भाजपाचे तालुकाध्यक्ष शिव ठाकरे भाजपच्या वरिष्ठ नेत्यांना बोंबलत फिरत होते. परंतु काहीच फरक त्यावेळी प्रतापराव जाधवांना पडला नाही. भाजपाची किती किंमत आहे.किती मतदार आहे. हे समजलं म्हणून प्रतापराव जाधवांनी तालुका अध्यक्ष याचं कोणी ऐकत नसल्यामुळे भाजपाला तिकिट नाकारले असल्याचे कालच्या दोन गटामुळे समजले . हे तितकंच खरं.. असेल.

ताज्या बातम्या

ताज्या बातम्या