spot_img

श्री मुंगसाजी महाराज नागरी सहकारी पतसंस्थेची जानेफळ शाखा उत्कृष्ट पुरस्काराने सन्मानित सतरा शाखामधून जानेफळची शाखा ठरली अव्वल !

 

जानेफळ ( अनिल मंजुळकर.रोखठोक न्यूज वृत्त सेवा)

श्री मुंगसाजी महाराज नागरी सहकारी पतसंस्था चिखलीची 20 वी वार्षिक आमसभा चिखली येथे सरस्वती नर्सिंग कॉलेज चिखली येथे मोठ्या थाटामाटात संपन्न झाली त्यावेळी संस्थेच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष स्थानी माजी आमदार राहुल बोंद्रे, प्रमुख अतिथी पदवीधर मतदार संघाचे आमदार धीरज लिंगाडे, श्री मुंगसाजी महाराज नागरी सहकारी पतसंस्थेचे संस्थापक अध्यक्ष दिपक देशमाने व संचालक मंडळ उपस्थित होते.

17 शाखा मधून शाखा जानेफळला उत्कृष्ठ शाखा म्हणून पुरस्कार मिळाला जानेफळ शाखेचे एका वर्षात ठेवी दुप्पट व दिडपट कर्ज वाटप केले असून सर्व शाखा मधून जानेफळ शाखा हि प्रथम क्रमांकाची ठरली आहे.

बक्षीस स्वरुपात प्रथम बक्षीस 51000/-₹ चे पारितोषिक व सन्माचिन्ह देऊन सन्मानीत केले बक्षीस स्वीकारताना शाखा व्यवस्थापक दिपक हिवरकर रवि चांगाडे,निखिल मोताफळे सौ दुर्गा गोतरकर शिवशंकर ढोबळे कामेश बार्डेकर अल्पबचत प्रतिनिधी डोमळे गुमटकर इत्यादी उपस्थिती होते या पुरस्कराचे श्रेय शाखा व्यवस्थापक हिवरकर यांनी शाखा जानेफळचे स्थानिक सल्लागार मंडळ,सभासद, खातेदार, व संस्थेचे हितचिंतक यांना दिले.

ताज्या बातम्या

ताज्या बातम्या