spot_img

वाचाळ व बोलघेवड्या बानवकुळेचा ‘त्या’ वादग्रस्त व्यक्तव्यावरुन पञकार आक्रमक मेहकर शहर पत्रकार संघाकडून व्यक्त केला निषेध

 

मेहकर – (सादिक कुरेशी.रोकठोक न्यूज वृत्त सेवा)

नेहमी आपल्या वाचाळ आणी बोलघेवड्या वाणीने आणी वादग्रस्त वक्तव्यावरुन वाद निर्माण करणारे बावनकुळे यांनी एका वक्तव्यावरुन समस्त पञकार बांधवांचा अपमान केल्याने मेहकर तालुका पञकार संघाकडुन जाहीर निषेध व्यक्त करुन बावनकुळेने पञकारांची जाहीर माफी मागावी अशी मागणी केली आहे.

ऊनवारा असो की पाऊस पञकार आपल्या घरादाराला बाजुला ठेवुन वस्तुनिष्ठ पञकारीता करुन सत्य ऊजेडात आणत असतात.आपल्या लेखणीने जनसामान्यांना न्याय मिळवुन देवून सामाजीक दायित्वही जोपासत असतात.जनता आणी प्रशासन यामधला दुवा पञकार आहेत म्हणूनच पञकारांना लोकशाहीचा चौथा स्तंभ म्हणतात.परंतु पञकारीतेसारख्या पविञ्य वसा घेतलेल्या पञकारांचा एका वादग्रस्त वक्तव्यावरुन अपमान केला आहे.

मेहकर शहर पञकार संघाने बावनकुळेचा जाहीर निषेध व्यक्त केला आहे.पञकारीता ही कुणाच्याही दावणीला बांधलेली नसुन तळागाळातल्या आणी जनसामान्यांच्या प्रश्नांना वाचा फोडणारी आणी प्रसंगी तळहातावर शिर घेवून लेखणीने वाईटांशी युध्द करणार्‍या समस्त पञकारांचा वाचाळ बावनकुळेला नक्कीच योग्य जागा दाखवणार असल्याचेही सांगीतले.

भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात पत्रकारांबद्दल काढलेल्या अनुचित उदगाराबद्दल मेहकर येथे तहसीलदारांना शहर पत्रकार संघाचे वतीने दिलेल्या निवेदनातून निषेध करण्यात आला आहे.बावनकुळे यांनी अहमदनगर जिल्ह्यात कार्यकर्ता मेळाव्यात पत्रकारांना चहा पाजा, ढाब्यावर जेवायला न्या, असे उदगार काढून पत्रकारांचा अवमान केल्याने त्यांनी पदाचा राजीनामा देण्याची मागणी निवेदनातून करण्यात आली .

 

निषेधही नोंदविण्यात आला. यावेळी पत्रकार संघाचे अध्यक्ष दत्ता उमाळे, पत्रकार उद्धव फंगाळ ,विनोद बोरे, अनिल मंजुळकर, कैलास राऊत, नागेश कांगणे, नारायण पचेरवाल, संतोष सारडा, सादिक कुरेशी, अय्याजशहा, जमीर शाह, अन्सार शेख, निलेश काळे, रवींद्र वानखेडे आदी उपस्थित होते.

ताज्या बातम्या

ताज्या बातम्या