spot_img

पत्रकारांबाबतीत बावनकुळे यांचे वक्तव्य वैफल्यातूनच : प्रा सदानंद माळी

 

चिखली एकनाथ माळेकर

भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष व माजी ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी आपल्या कार्यकर्त्यांना सल्ला देताना म्हणाले की, पत्रकारांना चहा पाजा , धाब्यावर न्या आपल्या विरूद्ध २०२४ पर्यंत विरूद्ध बातमी नको. असे निंदनिय वक्तव्य वैफल्यग्रस्ततेतून केले असल्याची टीका करत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नवनिर्वाचित बुलडाणा जिल्हा संघटक प्रा सदानंद माळी यांनी जोरदार प्रत्युत्तर दिले.

फडणवीस सरकारमध्ये मंत्री असताना बावनकुळे यांनी केलेले काळे धंदे त्यांना आठवले असतील, त्यामुळे त्यांना व त्यांच्या पत्नीला भाजपने तिकीट नाकारले होते,आणि आता सत्ता ढासळत असताना आपणांस याही वेळी तिकीट मिळेल की नाही अशा द्विधा मनस्थितीत बावनकुळे अडकल्यामुळे ते फार खचले असून वैफल्य ग्रस्त झाले आहेत त्यातून असे वक्त्यव्य होत आहेत असा घणाघाती टोला ही प्रा माळी यांनी या वेळी लगावला.

पत्रकार हा लोकशाहीचा चौथा आधारस्तंभ आहे आणि अजूनही अनेक पत्रकार सक्षमतेने आपली भुमिका ठामपने मांडत आहेत, त्यामुळें पत्रकारांची भिती भाजपा सरकारला असल्याने व २०२४ मध्ये त्यांचे पितळ उघडे पाडणार असल्याने संपूर्ण भाजप नेत्यांमध्ये चिंता आहे , यांना जनता रस्त्यावर सामोरा समोर बोलत असल्याने आपल्या चुकीच्या बातम्या येऊ नये म्हणून पत्रकारांना एक प्रकारे आमिष दाखविले जात आहे,परंतु पत्रकार अशा अमिषाला कधी बळी पडले नाही आणि पडणार नाही अशी ग्वाही सुध्दा या वेळी दिली.

ताज्या बातम्या

ताज्या बातम्या