“करुया बोल घेवडया योजनांचा भांडाफोड ” गाव निहाय बैठका जोमात .
मेहकर (अनिल मंजुळकर. रोखठोक न्यूज वृत्त सेवा) मेहकर तालुक्यात गाव निहाय बैठका घेऊन अनेक शासकीय योजनांचा भांडाफोड होणार आहे. यासाठी सज्ज झाले ते उद्धव बाळासाहेब ठाकरे गटातील नेतेमंडळी, बोगस कामे करणाऱ्या कंत्राटदारांची चांगलीच गोची होणार असल्याचे बोलल्या जात आहे.
प्रतापगडाला हादरा देण्यासाठी सर्वच पक्षीय नेते मंडळी कामाला लागलेली आहे. शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख यांच्या आदेशाने मेहकर तालुका गाव निहाय बैठका करून ‘करुया बोल घेवड्या योजनांचा भांडाफोड प्रत्येक गावात होणार आहे. जिल्हा परिषद सर्कल व पंचायत समिती गणा मध्ये होऊ द्या चर्चा हा विषय ठीक ठिकाणी रंगणार आहे. लवकरात लवकर निवडणुका जाहीर होणार असल्याचे संकेत प्राप्त होत आहेत.
यासाठी जानेफळ जिल्हा परिषद सर्कल मधील जानेफळ रत्नापूर ,लावणा ,नायगाव ,मोसंबी वाडी, मिस्किन वाडी, सावत्रा,सोनार गव्हाण, व हिवरा खुर्द पंचायत समिती गण मधील हिवरा खुर्द , मुंदेफळ उटी पार्डी गोमेधर, निंबा ,लोणी काळे, बारडा वडाळी मोहना मांडवा इ. गावांचा समावेश आहे. या गावात शासकीय योजना झाल्या आहेत. कंत्राटदाराने किती प्रमाणात शासकीय योजना चांगल्या केल्या व किती खराब केल्या यांचा उहापोह केला जाणार आहे. त्यामुळे शासकीय अधिकारी सह कंत्राटदार गोत्यात येणार असल्याचे बोलले जात आहे. या कार्यक्रमाच्या उपस्थितीत शिवसेना उपजिल्हाप्रमुख प्रा. आशिष दिलीपराव रहाटे .
शिवसेना शहर प्रमुख किशोर भास्करराव गारोळे , शिवसेना उपतालुका प्रमुख सुरेश काठोळे उटी, शिवसेना तालुकाप्रमुख निंबाजी पांडव व एडवोकेट आकाश गुलाबराव घोडे हे राहणार आहेत. त्यामुळे होऊ द्या चर्चा हे कितपत यशस्वी होणार हे सुद्धा पहावें लागणार आहे.