spot_img

उद्या देऊळगाव माळी येथे स्पर्धा परीक्षा विषयक भव्य मोफत सेमिनार रिलायबल स्पर्धा परीक्षा केंद्राचे मार्गदर्शक धनंजय आकात करणार मार्गदर्शन.

मेहकर (रवींद्र सुरुशे. रोखठोक न्यूज वृत्त सेवा )

श्री. मारुती गणेश मित्र मंडळ व महात्मा ज्योतिबा फुले विद्यालय दे:माळी यांच्या संयुक्त विद्यमानाने भव्य मोफत स्पर्धा परीक्षा व एमपीएससी, यूपीएससी, तसेच विद्यार्थ्यांचा मूळ पाया कुठून ठरतो. अशा विविध विषयांवर हे मार्गदर्शन शिबिर ठेवण्यात आले आहे. यासाठी स्पर्धा परीक्षा, एमपीएससी,यूपीएससी, क्षेत्रातील छत्रपती संभाजी नगर येथील रिलायबल स्पर्धा परीक्षा केंद्राचे तज्ञ मार्गदर्शक धनंजय आकात यांचे बहुमोलाचे मार्गदर्शन लाभणार आहे. हे मार्गदर्शन म. ज्यो. फुले विद्यालय दे.माळी ता.मेहकर दिनांक 25 सप्टेंबर सोमवार ला सकाळी साडेअकरा वाजता ठेवण्यात आले आहे. तरी या सुवर्णसंधीचा विद्यार्थ्यांनी लाभ घेण्याचे आवाहन मारुती गणेश मित्र मंडळ तसेच म. ज्यो. फुले विद्यालयाचे प्राचार्य विश्वनाथ बाहेकर यांनी केले आहे.

ताज्या बातम्या

ताज्या बातम्या