spot_img

चंद्रपूर जिल्ह्यात सोयाबीन पीकावर विविध रोगांचा प्रादुर्भाव कृषी अधिकाऱ्यांनी तातडीने पंचनामे करून शेतकऱ्यांना नुकसान भरपाई द्यावी – राजू झोडेंची मागणी

चंद्रपूर (किरण घाटे . रोखठोक न्यूज वृत्त सेवा)चंद्रपूर जिल्ह्यात सोयाबीन पीकांवर विविध रोगांचा प्रादुर्भाव झाला असून संपूर्ण सोयाबीनच्या शेंगा तुटून पडत आहेत.एव्हढेच नाही अलगद पाने गळून पडत आहे .

विशेष म्हणजे ते पीक पिवळसर रंगाचे पडले आहेत.कृषी अधिकाऱ्यांनी आपल्या स्तरावरुन तात्काळ पंचनामे करून शेतकऱ्यांना नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी उलगुलान संघटनेचे अध्यक्ष राजू झोडे यांनी आज केली आहे.

माहे ऑगस्ट व सप्टेंबर या महिन्यात सोयाबीन पीक दाणे भरण्याच्या अवस्थेत असताना अचानकपणे सोयाबीन पीकावर विविध कीड व रोगांचा प्रादुर्भाव आल्याने तीनच दिवसांत संपूर्ण सोयाबीन पीके पिवळे पडली. मोठ्या प्रमाणात सोयाबीन पीकांचे नुकसान झाले आहे. यामुळे शेतकऱ्यांचा हाताशी आलेले उत्पन्न हिरावल्या जात आहे.

खरीप हंगामातील पीक हातचे गेल्याने रब्बी हंगामाचे नियोजन कोलमडले आहे. अचानक सोयाबिन पीकावर आलेल्या रोग प्रादुर्भावाने शेतकरी आर्थिक संकटात अडकला आहे.

शेतकऱ्यांच्या परिस्थितीचा विचार करता कृषी अधिकाऱ्यांनी तात्काळ पंचनामे करून शेतकऱ्यांना नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी उलगुलान संघटनेचे अध्यक्ष राजू झोडे यांनी एका प्रसिध्दी पत्रकातून केली आहे.

ताज्या बातम्या

ताज्या बातम्या