(अनिल मंजुळकर रोखठोक न्यूज वृत्त सेवा)
बुलढाणा: विदर्भ पंढरी शेगाव येथे आज बुधवारी गजानन पुण्यतिथी सोहळा(ऋषीपंचमी निमित्त) भाविकांची मांदियाळी जमली! विदर्भासह राज्यातील अन्य भागातून शेकडो दिंड्या दाखल झाल्याने मंदिरपरिसर व रस्ते आबालवृद्ध भाविकानी फुलल्याचे दिसून आले.
श्री गजानन महाराज यांनी ११३ वर्षांपूर्वी तिथीनुसार ऋषी पंचमीला संजीवन समाधी घेतली होती.
श्रींच्या पुण्यतिथीनिमित्त ऋषिपंचमी उत्सव मोठ्या उत्साहात संतनगरी शेगाव येथे साजरा केला जातो. यानिमित्त संतनगरीत जिल्ह्यासह राज्यातील भाविक मोठ्या संख्येने दाखल होतात. यंदाही ही परंपरा कायम राहिली. दोन दिवसांपासून दिंड्या दाखल होत असून आज सकाळ पर्यंत सुमारे साडेचारशे दिंड्या दाखल झाल्याचा अंदाज आहे.
गजानन महाराज मंदिर संस्थानच्या वतीने १६ सप्टेंबर पासून विविध धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. आज सकाळी भारतबुवा म्हैसवाडीकर यांचे ‘श्रीं’ च्या समाधी सोहळ्यावर कीर्तन पार पडले. सोळा तारखेपासून सुरू असलेल्या गणेशयाग व वरुण यागाची पूर्णाहुती देण्यात आली
आज सकाळपासूनच भक्तांनी मंदिरात गर्दी केली सकाळी चार वाजेपासून दर्शनाच्या रांगा लागल्या आहेत.
संजीवनी समाधी
गजानन महाराजांनी ११३ वर्षांपूर्वी आठ सप्टेंबर १९१० रोजी संजीवन समाधी घेतली. तिथीनुसार तो ऋषीपंचमीचा दिवस होता. त्यानिमित्त दरवर्षी ऋषिपंचमीच्या दिवशी पुण्यतिथी सोहळा पारंपरिक पद्धतीने व भक्तीमय वातावरणात साजरा करण्यात येतो.