मेहकर (अनिल मंजुळकर . रोखठोक न्यूज वृत्त सेवा )
टेनिस क्रिकेट असोसिएशन महाराष्ट्र व धाराशिव टेनिस क्रिकेट असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने पाचवी सब ज्युनिअर टेनिस क्रिकेट चॅम्पियनशिप स्पर्धा के.के.पाटील इंजिनिअरिंग कॉलेज येथे पार पडल्या. त्यात कृष्णा देवानंद चांदणे यांची राष्ट्रीय टेनिस क्रिकेट स्पर्धेसाठी निवड झाल्याबद्दल त्यांचे राज्यातून सर्वत्र अभिनंदन होत आहे.
मेहकर तालुक्यात फक्त कबड्डी , व्हाॅलीबाॅल आणि खो-खो याच खेळात आजपर्यंत तालुक्यातील खेळाडूंचे वर्चस्व होते पण खेळाची आवड तालुक्यातील विविध विद्यार्थ्यांना लागली असल्याने क्रिकेट या खेळामध्ये निवड झालेल्या आजपर्यंतचा तालुक्यातील हा प्रथमच खेळाडू असून कृष्णा हा प्रा.एन.डी.पाटील माध्यमिक विद्यालय हिवरा खुर्द तालुका मेहकर जिल्हा बुलढाणा येथे इयत्ता दहावी मध्ये तो शिकत आहे त्याच्या निवडीबद्दल भारतीय टेनिस क्रिकेट असोसिएशनच्या सचिव मीनाक्षी गिरी अमरावती विभाग प्रमुख गोवर्धन राठोड शाळेचे अध्यक्ष ॲड.दत्ताजी भुतेकर,सचिव सौ.रेखाताई भुतेकर, मुख्याध्यापक सुरेश मुठ्ठे परिसरातील क्रिकेट खेळाडू टीम व पालक देवानंद चांदणे यांनी अभिनंदन केले व पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.