मेहकर (उध्दव फंगाळ . रोखठोक न्यूज वृत्त सेवा)
गत महिन्यापासून शिक्षक कॉलनी येथे ३७/१ लेआऊट मधील शिक्षक कॉलनी येथील भूखंडावर उद्यान विकसित करण्याचे काम होत आहे. उद्यानाच्या वॉल कंपाऊंड बांधक व उद्यानातील जॉगिंग ट्रॅकच्या कामासह इतर विकास कामात अडथळा ठरणारे अतिक्रमण हटवण्यात यावे. अशी मागणी शिक्षक कॉलनी वाशीयांनी येथील उपविभागीय अधिकारी व मुख्याधिकाऱ्यांकडे केलेली आहे.
उद्यानमध्ये अवैधरित्या करण्यात आलेले अतिक्रमण हटवण्या साठी नगर प्रशासनाला अद्यापही मुहूर्त मिळेना हे उल्लेखनीय आहे.नगर परिषद अंतर्गत व सार्वजनिक बांधकाम विभागाच्या माध्यमातून३७/१ लेआऊट मधील शिक्षक कॉलनी येथील भूखंडावर आरक्षित मोकळ्या जागेत सदरचे वाल कंपाऊंडसह उद्यान विकसित करण्याचे काम सुरू आहे.
परंतु उद्याना नजिकच राहणार्या काही लोकांनी स्वार्थी हेतूने उद्यानाच्या जागेवर अतिक्रमण केले आहे.त्यामुळे वाल कंपाऊंड सह उद्यान विकसित करण्याचे कामात अडथळा निर्माण झाला आहे.या विकास कामाच्या माध्यमातून वॉल कंपाऊंड सह जॉगिंग ट्रॅक बांधकामात अडथळा येत आहे.
सदरचे अवैधरित्या केलेल्या अतिक्रमणामुळे विकास काम अपूर्ण राहणार आहे.या संदर्भात सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपविभागीय अधिकारी यांचेशी संवाद साधला असता,ते म्हणाले की, सदरचे अतिक्रमण हटवण्या संदर्भात येथील नगर प्रशासनाला पत्र देण्यात आले आहे.मात्र अद्यापही नगर प्रशासनाने अतिक्रमण पाडले नाही.तरी वॉल कंपाऊंड सह उद्यान विकास कामात अडथळा ठरणारे अतिक्रमण नगर प्रशासनाकडून केव्हा हटवण्यात येते? याकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे.