spot_img

साखरखेर्डा ऐतिहासिक गाव आगामी गणेशोत्सव व ईद शांततेत साजरी करा – ठाणेदार -नंदकिशोर काळे

 

 

बुलढाणा( सचिन खंडारे रोखठोक न्युज वृत्त सेवा)

 

आगामी २८ सप्टेंबरला गणेशोत्सव विसर्जन मिरवणूक व ईद एकाच दिवशी येत आहे त्या पार्श्वभूमीवर साखरखेर्डा येथे दिनांक १६ सप्टेंबर रोजी साखरखेर्डा पोलीस स्टेशन मधील स्वर्गीय सचिन शिंदे सभागृहामध्ये ठाणेदार नंदकिशोर काळे यांच्या अध्यक्षतेखाली साखरखेर्डा गावातील नागरिकांची शांतता समितीची बैठक पार पडली ‘

या बैठकीमध्ये आगामी गणेश विसर्जन मिरवणूक व ईद सणाच्या पार्श्वभूमीवर

चर्चा करण्यात आली ‘

यामध्ये सुरुवातीला शांतता समितीचे जिल्हा सदस्य माजी प्राचार्य दसरे यांनी साखरखेर्डा हे गाव एकोप्याचे गाव म्हणून प्रसिद्ध असून सर्व धर्माचे लोक प्रत्येक एकमेकांच्या सणांमध्ये उत्साहामध्ये सहभागी होत असतात ‘त्यामुळे प्रत्येक क्षणामध्ये कुठल्याही सणाला गालबोट लागू नये त्याच्यासाठी प्रत्येकाने खबरदारी व काळजी घेतली गेली पाहिजे असे सांगितले ‘त्यानंतर जिल्हा शांतता समितीचे सदस्य अस्लम अंजूम यांनी आगामी 28 सप्टेंबरला गणेश विसर्जन व ईद असून या दिवशी शांततेचा संदेश देणारे मोहम्मद पैगंबर यांची जयंती आहे त्यामुळे जयंतीच्या दिवशी मुस्लिम बांधवांना ईद साजरी करण्याकरिता दुपारी बारा वाजेपर्यंत वेळ देण्यात यावी या वेळेमध्ये आम्ही आमची साजरी करू असे सांगितले ‘व पुन्हा गणपती मिरवणुकीमध्ये मुस्लिम बांधव यांना सहभागी सुद्धा होता येईल ‘यानंतर पत्रकार डी.एन . पांचाळ सर ‘भाजपा ज्येष्ठ नेते रावसाहेब देशपांडे ‘

यांनी सुद्धा आपले विचार व्यक्त केले .

साखरखेर्डा गावचे माजी सरपंच दाऊद शेठ कुरेशी यांनी सुद्धा आपले विचार व्यक्त करताना सांगितले की ‘एक दिवस अगोदर दारूचे दुकाने बंद ठेवण्याच्या सूचना देण्यात याव्या जेणेकरून गावामध्ये शांतता भंग होणार नाही ‘हिंदू आणि मुस्लिम प्रत्येक सणामध्ये सहभागी होत असतात ‘

त्यानंतर साखरखेर्डा नगरीचे उपसरपंच सय्यद रफीक यांनी ‘मुस्लिम बांधवांना हिंदू बांधवांच्या सोबत ग्रामपंचायत मध्ये किंवा लग्न समारंभामध्ये किंवा इतर ठिकाणी सोबतच असतो ‘त्यामुळे हिंदू व मुस्लिम बांधवांचे सण आपण प्रत्येकाने एकमेकांच्या सणांमध्ये सहभागी होऊन साजरे करण्यात यावेत .व सणाचा आनंद घ्यावा ‘

त्यानंतर कार्यक्रमाच्या अध्यक्ष स्थानावरून मार्गदर्शन करताना कर्तव्यदक्ष ठाणेदार नंदकिशोर काळे यांनी सांगितले की आगामी ईद व गणेशउत्सव मिरवणूक सर्वांनी शांततेत सादरी करावी ‘यामध्ये गुलालामध्ये अनेक ठिकाणी केमिकल चा वापर होतो त्यामुळे गुलाल ऐवजी आपण जर फुले वापरली तर ते अधिक सोयीचे होईल ‘मागील घडलेली घटना हे पुन्हा उकरून न काढता पुढील घटना व पुढील उत्सव व शांततेत साजरी झाले पाहिजे व आपल्याला गर्दी नसून दर्दी माणसे हवेत असे सांगून सर्वांनी ईद व गणेशोत्सव शांततेत साजरी करावे असे आवाहन केले ‘

या बैठकीला ‘साखरखेर्डा सरपंच पती सुनील जगताप ‘ उपसरपंच सय्यद रफीक ‘साखरखेर्डा तंटामुक्तीचे अध्यक्ष संतोष मंडळकर ‘ माजी सरपंच दाऊदशेठ कुरेशी ‘जिल्हा शांतता समितीचे सदस्य असलम अंजुम ‘त्याचबरोबर जिल्हा शांतता समितीचे सदस्य मा .प्राचार्य संतोष दसरे .भाजपा ज्येष्ठ नेते रावसाहेब देशपांडे ‘गणेश मंडळाचे अध्यक्ष ‘गोपाल शिराळे,सामाजिक कार्यकर्ते सुनील रिंढे ‘ज्येष्ठ पत्रकार डि .एन . पंचाळ ‘ज्येष्ठ पत्रकार अशोक इंगळे ‘पत्रकार गणेश पंजरकर ‘ग्रामपंचायत सदस्य संग्रामसिंग राजपूत,अन्सार शेठ कुरेशी ‘ डॉ .देशपांडे ‘ मिर्झा ‘ श्री शिवाजी हायस्कूल चे मुख्याध्यापक देशमाने त्याचबरोबर पोलीस विभागाच्या वतीने राजे जाधव ‘पोलीस शिपाई काळे उपस्थित होते ‘

ताज्या बातम्या

ताज्या बातम्या