spot_img

आज शिवसेना महायुतीच्या वतीने मेहकर मध्ये कृतज्ञता मेळाव्याचे आयोजन

मेहकर: (हर्षल गायकवाड. रोखठोक न्युज वृत्तसेवा)

रविवारी ८ डिसेंबर ला अकरा वाजता मेहकर येथील वेदिका लॉन सभागृहात शिवसेना महायुतीच्या वतीने कृतज्ञता मेळाव्याचे भव्य आयोजन करण्यात आले आहे.महायुतीतील सर्व पक्षांचे आजीमाजी पदाधिकारी मेळाव्याला उपस्थिती लावणार आहेत.
विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महायुतीतील शिवसेना, भाजप, राष्ट्रवादी काँग्रेस व सर्व मित्र पक्षांच्या वतीने या कृतज्ञता मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. मेहकर येथील सोनाटी रोड चौफुली जवळील वेदिका लॉन सभागृहात सदर आयोजन करण्यात आले आहे. महायुतीतील सर्व घटक पक्षांच्या आजीमाजी पदाधिकाऱ्यांनी सदर कृतज्ञता मिळाव्यास मोठ्या संख्येने उपस्थित राहावे ,असे आवाहन शिवसेना, युवासेना, महिला आघाडी व मित्र पक्षांच्या वतीने करण्यात आले आहे.
केंद्रीय आयुष ,आरोग्य ,कुटुंब कल्याण मंत्री प्रतापराव जाधव, पंचायत राज समितीचे राज्याचे अध्यक्ष संजय रायमुलकर यावेळी प्रामुख्याने उपस्थित राहणार आहेत.

ताज्या बातम्या

ताज्या बातम्या