चिखली: (रोखठोक न्युज वृत्तसेवा)
मेहकर मतदार संघाचे नवनिर्वाचित आमदार सिद्धार्थ खरात यांनी मराठा सेवा संघाचे संस्थापक अध्यक्ष ॲड. पुरुषोत्तम खेडेकर यांची भेट घेतली. ॲड. खेडेकर यांच्या चिखली निवासस्थानी जाऊन त्यांचे आशीर्वाद घेतले. यावेळी आमदार सिद्धार्थ खरात यांना जिजाऊ-शिवरायांची प्रतिमा भेट देऊन त्यांचा सत्कार खेडेकर परिवाराने केला. यावेळी माजी आमदार रेखाताई खेडेकर, कॉंग्रेस नेते लक्ष्मणराव घुमरे, संभाजी ब्रिगेडच्या विचारांशी प्रामाणिक राहुन काम करणारे प्रदीप बिल्लोरे उपस्थित होते. यावेळी विविध सकारात्मक विषयांवर चर्चा करण्यात आली.
यावेळी जिजाऊ सृष्टीचा विकास, मातृतिर्थ सिंदखेडराजा, लोणार सरोवर, अजिंठा वेरुळ लेणी हे ग्लोबल टुरिझम सर्किट व्हावे या संदर्भातील ॲड पुरुषोत्तम खेडेकर यांच्या संकल्पना आमदार सिद्धार्थ खरात यांनी जाणून घेतल्या. आमदार सिद्धार्थ खरात हे गत अनेक वर्षांपासून जिजाऊ जयंतीदिनी खिचडीचे वाटप करतात. मराठा सेवा संघासह अनेक पुरोगामी चळवळींशी त्यांची नाळ जुटलेली आहे. मिलिंद महाविद्यालयाचे ते विद्यार्थी असल्याने महापुरुषांचे विचार त्यांच्या रोमारोमात भिनले आहे. वारकरी चळवळीशी एकनिष्ठ राहून संतांचे समन्यायी विचार समाजात पोहोचविण्याचे काम ते सातत्याने करीत आले आहेत.