spot_img

शिवसेना आमदार सिध्दार्थ खरात यांनी घेतला पेनटाकळी प्रकल्प सद्यस्थितीचा आढावा शेतकऱ्यांना लवकरच पाणी मिळण्यासाठी स्वतः पायी चालत कालवा बघितला

मेहकर: (अनिल मंजुळकर. रोखठोक न्युज वृत्तसेवा)

शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) आमदार सिध्दार्थ खरात यांनी आज मेहकर तालुक्यातील शेतकऱ्यांच्या पेनटाकळी कालव्याबाबत असलेल्या समस्येवर उपाययोजना जाणून घेण्यासाठी अधिकाऱ्यांची बैठक घेऊन निर्देश दिले .

मेहकर तालुक्यातील शेतकऱ्यांनी आज पेनटाकळी मध्यम प्रकल्पाच्या कालव्यातुन पाझरणाऱ्या पाण्याबाबत तसेच शेतकऱ्यांना रब्बी हंगामासाठी पाणी मिळत नसल्याने आमदार सिध्दार्थ खरात यांची भेट घेतली. आमदार महोदयांनी तात्काळ पेनटाकळी प्रकल्प सिंचन व्यवस्थापन च्या अधिकाऱ्यांना बोलावून सद्य परिस्थिती जाणून घेतली.

यावेळी अधिकाऱ्यांनी सांगितले की सदर प्रकल्पाचे 0 ते ११ कि.मी.कालवा दुरुस्ती चा कंत्राट अंदाजे ७२ कोटी रु माणिक इन्फ्रास्ट्रक्चर ,छत्रपती संभाजीनगर ला दिला आहे.कंत्राटदाराने कामाला सुरुवात केली आहे. तसेच कालव्यातील कचरा साफ करणे, झाडे, झुडपे तोडणे व ११ कि.मी.पुढील कालव्याची छोटी मोठी कामे सुद्धा लवकरच सुरू होणार आहेत.

एकंदरीत ११ कि.मी.पर्यतच्या कामाकरिता कंत्राटदाराला १८ महिण्याचा काम पूर्ण करण्याचा कालावधी आहे. तेव्हा २०२५ मध्ये काम पूर्ण होऊन शेवटच्या शेतकऱ्यांना पाणी मिळेल असे अधिकाऱ्यांनी सांगितले.

तेव्हा शक्य तितक्या लवकर काम पूर्ण करून व उपाययोजना करून पाणी पोहोचवा ,काही अडचण आली तर मंत्रालयात मी पाठपुरावा करीन मात्र प्रकल्पाच्या पाण्याचा लाभ शेतकऱ्यांना मिळू द्या असे निर्देश त्यांनी आज दिले. बैठकीला उपजिल्हा प्रमुख आशिष रहाटे, उपविभागीय अधिकारी एम.के.तांबागडे,शाखा अभियंता आर.पी.राजगुरू, सहाय्यक अभियंता गौरव जुआर,शाखा अभियंता आकाश शिंदे सह कर्मचारी उपस्थित होते.

आमदार सिद्धार्थ खरात शेतकऱ्यांसाठी सरसावले !

मेहकर मतदार संघाचे नवनिर्वाचित आमदार सिद्धार्थ खरात यांनी आपल्या कामाची चुनुक दाखवायला सुरुवात करत आज वाडीजवळील असलेला कॅनॉल व कॅनॉल चा बोगद्याची पाहणी केली यावेळी त्यांच्यासमवेत अँड.गणेश देवकर , माजी तंटामुक्त अध्यक्ष तथा उपसरपंच गणेश पाखरे , गणेश मोसंबे वाडी परिसरातील असंख्य शेतकरी बांधव होते.

व त्यांनी यावेळी संबंधित आमदारांना या कॅनॉल संदर्भात माहिती देऊन लवकरात लवकर हा प्रश्न मार्गी लावा अशा प्रकारची विनंती केली तर आमदार सिद्धार्थ खरात यांनीही वरवर पाहणी न करता ते खाली उतरून त्या बोगद्यापर्यंत जाऊन त्या ठिकाणची परिस्थिती पाहिली व यासंदर्भात शासकीय विश्रामगृह मेहकर येथे अधिकाऱ्यांची बैठक घेऊन या; कामासंदर्भात माहिती घेऊन अधिकाऱ्यांना पुढील कामासाठी वेगाने कामे करण्यासाठी सूचना केल्या. यामुळे सिद्धार्थ खरात यांच्या वेगवान कामाची दिवस भर चर्चा शेतकऱ्यांमध्ये होती.

ताज्या बातम्या

ताज्या बातम्या