मेहकर (जमिर शहा. रोखठोक न्युज वृत्तसेवा)
निवडणूक विभागाचे काम म्हणजे प्रथम प्रधान्याने त्यात कोणताच हलगर्जी पणा नको असा अलिखित नियम असून तेव्हढ्याच तत्परतेने सर्वच विभागाचे कर्मचारी हे काम करतात मात्र त्यांना मिळणाऱ्या जेवणावर कोणाचेही लक्ष नसल्याने या कर्मचाऱ्यांना नाईलाजाने तेथील जेवण घ्यावे लागते तर दुसरीकडे प्रशिक्षण कार्यक्रमात असलेल्या जेवणात मोठा अधिकारी येत असेल तर जेवण वेगळे नाहीतर पुरी आलूची भाजी आहेच,निवडणूक विभागाच्या जेवणा बद्दल कर्मचारी तीव्र नाराजी व्यक्त करीत आहेत.
लोकशाहीच्या उत्सवा मध्ये मतदान प्रक्रिया ही खूप महत्वाची असते तेव्हा हा उत्सव निर्विघ्नपणे पार पाडण्या साठी निवडणूक विभाग हा सर्व शासकीय विभागाला कामाला लावतो त्यांना सुद्धा निवडणूक विभागाचे काम हे प्रथम प्रधान्याने करावे लागते ज्यात निवडणूक मध्ये मतदान प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी शिक्षकांच्या नियुक्त्या केल्या जातात त्यांचे प्रशिक्षण होते तर दुसरे प्रशिक्षण हे ज्या मतदार संघात नियुक्त्या केल्या त्या मतदार संघात असे दोन प्रशिक्षण होतात तर ई व्ही एम सिलबंद करणे या साठी सर्व शासकीय विभागाचे क्लास वन अधिकारी, तलाठी, मंडळ अधिकारी, महसूल सहाय्यक, नायब तहसीलदार असे कर्मचारी असतात तेव्हा त्यांना जेवण देण्यात येतो तर निवडणूक कर्मचारी निवडणुकीचे कामकाज पार पाडून जेव्हा परत येतात.

तेव्हा जेवणाचा पार्सल दिल्या जातो मात्र निवडणूक मध्ये काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांची एकच ओरड असते ती म्हणजे जेवण चांगले का मिळत नाही कामात हलगर्जी पणा केला तर त्वरित कारणे दाखवा नोटीस किव्हा कार्यवाही करणाऱ्या निवडणूक विभागा मार्फत मिळणारे जेवण निकृष्ट व कर्मचाऱ्यांना पसंद न येणारे असून सुद्धा यावर कर्मचारी खुलून बोलत नाही त्यांना भीती असते निवडणूक विभागाची.

(12 नव्हेंबर रोजी वखार महामंडळंच्या गोडाऊन वरती निवडणूक साठी मतदान यंत्र तयार करण्याचे काम सुरु होते त्या साठी मेहकर व लोणार तालुक्यातील सर्व विभागाचे क्लास वन कर्मचारी, तलाठी, मंडळ अधिकारी, नायब तहसीलदार, महसूल सहाय्यक असे 250 पेक्षा जास्त कर्मचारी होते त्यांना दुपारी जेवणात असलेला मेनू म्हणजे पोळी सोबत वांग्याचे भरीत त्याला पाहता या कर्मचाऱ्यांनी तीव्र संताप व्यक्त केला मात्र सांगणार कोणाला तालुका पुरवठा अधिकारी, तहसीलदार, उपविभागीय महसूल अधिकारी सर्वजण तेथेच पण जेवणावरच कोणाचीही नजर नाही.)

(दोन्ही प्रशिक्षणच्या वेळी जेवण दिल्या गेले ते आलूची भाजी सोबत पुरी पाणी बाहेर जावून पिणे मधात कोणाला ठसका लागला तर त्याला काहीच इलाज नाही तर दुसरीकडे बुलढाणा येथील प्रशिक्षन कार्यक्रम मध्ये उत्कृष्ट जेवण तर जळगांव जामोद मध्ये बेसन पोळी अश्या जेवणाने निवडणूक विभागात काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांन मध्ये तीव्र नाराजी आहेत यावर पुण्य नगरीने कर्मचाऱ्यांना विचारले असता त्यांनी सांगितले की सर्वीकडे नजर ठेवणाऱ्या निवडणूक विभागाच्या जेवणावर जिल्हा अधिकारी किव्हा निवडणूक निरीक्षक यांनी तरी लक्ष द्यावे जेणेकरून निवडणुकी मध्ये काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांचे पोट खराब होणार नाही ते निवडणूक मध्ये उत्साहाने काम करतील )