spot_img

मुस्लिम बांधवांच्या न्याय हक्कासाठी मी सदैव तत्पर – आमदार संजय रायमुलकर वनसाईड मतदान – सिर्फ धनुष्यबाण मुस्लिम बांधवांनी झळकवले बॅनर

मेहकर (अनिल मंजुळकर. रोखठोक न्युज वृत्तसेवा)
सर्व जाती-धर्माच्या लोकांना सोबत घेऊन त्यांचा विकास व त्यांच्या हितासाठी लढत राहण्याचा शिवसेनेचा इतिहास आहे .मुस्लिम बांधवांच्या न्याय हक्कांसाठी मी सदैव तत्पर आहे व पुढेही राहील ,असे विचार आमदार संजय रायमुलकर यांनी व्यक्त केले. प्रभाग क्रमांक ३ व ७ च्या अल्पसंख्यांक समाजाच्या नागरिकांनी शिवसेना अल्पसंख्यांक विचारमंचाच्या माध्यमातून आयोजित केलेल्या मेळाव्यात ते बोलत होते.
इस्माईलभाई पठाण मेळाव्याच्या अध्यक्षस्थानी होते. यावेळी प्रचंड जल्लोषात मुस्लिम बांधवांनी रायमुलकर यांचे स्वागत केले. शिवसेनेचे शहर प्रमुख जयचंद बाठीया, नयनताई रायमुलकर,माजी नगरसेवक तौफिक कुरेशी, अख्तरभाई चुडीवाले, हनीफभाई गवळी, रहीम पठाण ,हाजी तुकडूभाई, फइम् पठाण ,इस्माईलखा पठाण ,इमाम भुरीवाले ,हुसेन गवळी ,गफ्फार भाई ,अशपाकखान, साबीर गवळी ,अशपाक ठेकेदार ,किरणताई हिवाळे, साबीर गवळी, शेख निषाद ,राजूभाई पठाण, रउफभाई, शेखलाल कुरेशी, चिकू मोकळे प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते.
मुस्लिम समाजाच्या वतीने संजय रायमुलकर यांचा अनेक पदाधिकाऱ्यांनी सत्कार केला.यावेळी ९६ मुस्लिम युवकांनी शिवसेनेत प्रवेश केला.त्यांचा आमदार रायमुलकर यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.आपला भाषणात आमदार संजय रायमुलकर म्हणाले की, प्रतापरावजी जाधव आणि मी सातत्याने अठरापगड जातीच्या लोकांना न्याय देण्याचा प्रयत्न करत आहोत .अल्पसंख्यांक समाजासाठी अनेक गावांमध्ये शादीखाने, कब्रस्तानला संरक्षण भिंती, सिमेंट रस्ते आदी २० कोटींची कामे केली. शहरातही इमामबाडा येथे ५० लाखाचा शादी खाना पंचपीर दर्गा येथे५० लाखाची विविध कामे ,गवळीपुरा येथील ५० लाखांचा शादीखाना, मोळा रोड वसाहतीत २५ लाख रुपयांचा शादीखाना आदी कामे प्रगतीत आहेत.शासनाच्या विविध योजनांचा लाभ मिळवून दिला आहे.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे विविध समाज घटकांना न्याय मिळवून देण्यासाठी सातत्याने प्रयत्नशील आहेत. लाडकी बहीण योजनेचा सर्वाधिक लाभ मुस्लिम समाजाच्या आयाबहिणींना आम्ही मिळवून दिला आहे .कुठेही जातीभेद केलेला नाही. याउलट काँग्रेसने आतापर्यंत जाती-जातींमध्ये भांडणे लावण्याचे राजकारण केलेले आहे, असा आरोपही त्यांनी केला. निवडणुकीत विरोधातील उमेदवार मुंबईत राहणारा असून काम पडल्यास आम्हीच नेहमी धावून येतो. लोकसभा निवडणुकीत बाहेरचे उमेदवार आले आणि गेले ,ते पुन्हा दिसले नाही ,असेही रायमुलकर म्हणाले.
मेहकर शहरात ९०० कोटी रुपयांची विविध विकास कामे आम्ही केलेली असून ती विशिष्ट लोकांसाठीच नव्हे, तर ती सर्वांच्याच उपयोगाची आहेत, असे सांगून संजय रायमुलकर म्हणाले की, अनेक मुस्लिम बांधवांशी माझे पारिवारिक संबंध आहेत. धनुष्यबाण निशाणीचे बटन दाबून मला विक्रमी मतांनी विजयी करा. मुस्लिम बांधवांच्या हितासाठी वेळ पडल्यास मी रस्त्यावरही उतरेल ,असेही ते म्हणाले.
शिवसेनेचे शहर प्रमुख जयचंद बाठीया आपल्या भाषणात म्हणाले की ,आमदार रायमुलकर हे कुठलाही भेदाभेद न करणारे नेते आहेत. मुस्लिम समाजासाठी त्यांनी मोठ्या प्रमाणावर विकास कामे मंजूर करून दिलेली आहेत .शिवसेना कुठलाही जातिभेद करत नाही. सर्वांच्या विकासासाठी आम्ही बांधील आहोत. यावेळी अख्तरभाई चुडीवाले यांच्यासह इतर वक्त्यांची भाषणे झाली.
वनसाईड मतदान- सिर्फ धनुष्यबाण हाच आता आमचा नारा असल्याचे वक्त्यांनी सांगितले. तशा पद्धतीचे बॅनरही सभास्थळी प्रदर्शित करण्यात आले होते.यावेळी मुस्लिम बंधुभगिनिंची विक्रमी उपस्थिती होती.

ताज्या बातम्या

ताज्या बातम्या