मेहकर (अनिल मंजुळकर. रोखठोक न्युज वृत्तसेवा)
शिवसेना-भाजप राष्ट्रवादी काँग्रेस महायुतीचे मेहकर विधानसभा मतदारसंघातील अधिकृत उमेदवार आमदार संजय रायमुलकर यांच्या प्रचारार्थ मंगळवारी तारीख १२ रोजी अकरा वाजता मेहकर येथे स्वातंत्र्य मैदानावर महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांची जाहीर सभा होणार आहे.
अतिशय धाडसी निर्णय घेणारे मुख्यमंत्री आणि लाडक्या बहिणींचे भाऊ एकनाथ शिंदे यांच्या कार्यकर्तुत्वाची सर्वत्र चर्चा असून मेहकर मधील सभेत ते काय बोलणार याबाबत नागरिकांमध्ये कमालीची उत्सुकता आहे. शिवसेनेचा ढाण्या वाघ म्हणून एकनाथ शिंदे ओळखले जातात.
राज्याच्या इतिहासात पहिल्यांदा जे बोलतो ते करतो अशा पद्धतीचे मुख्यमंत्री लाभले असून उद्धव ठाकरे यांची लोणार येथे जाहीर सभा झाली .त्या पार्श्वभूमीवर मेहकर येथे एकनाथजी शिंदे यांची जाहीर सभा होत आहे. त्यामुळे वेगळीच उत्सुकता आहे.यावेळी केंद्रीय आयुष, आरोग्य, कुटुंब कल्याण राज्यमंत्री( स्वतंत्र प्रभार) मा. प्रतापराव जाधव प्रामुख्याने उपस्थित राहणार आहेत.
महायुतीतील मित्र पक्षांच्या इतरही नेत्यांची सभेला प्रामुख्याने उपस्थिती असेल. शहरी व ग्रामीण भागामध्ये एकनाथजी शिंदे यांच्या व्यक्तिमत्त्वाचा वेगळा प्रभाव आहे. या जाहीर सभेला हजारोच्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन शिवसेना,भाजप, राष्ट्रवादी काँग्रेस महायुतीच्या वतीने करण्यात आले आहे.