spot_img

मुस्लिम समाज पूर्ण ताकदीनिशी आमदार संजय रायमुलकर यांच्याच पाठीशी – माजी नगरसेवक हनिफभाई गवळी रायमुलकरांच्या सत्काराला मुस्लिम बांधवांची तोबा गर्दी

मेहकर (अनिल मंजुळकर. रोखठोक न्युज वृत्तसेवा)

आमदार संजय रायमुलकर यांनी मेहकर, लोणार तालुक्यात मुस्लिम समाजासाठी शादीखाने, कब्रस्तानला संरक्षण भिंती, सिमेंट रस्ते, नाली बांधकाम आदी २५ कोटींपेक्षा जास्त रकमेची विकास कामे दिली असून ते अहोरात्र जनतेच्या सेवेत असतात .म्हणून मुस्लिम समाज पूर्ण ताकदीनिशी आमदार संजय रायमुलकर यांच्याच पाठीशी आहे. हे आम्ही मतदानातूनही दाखवून देऊ, असे विचार माजी नगरसेवक हनीफभाई गवळी यांनी व्यक्त केले.

मोळा रोड भागातील मुस्लिम बांधवांच्या वतीने आमदार संजय रायमुलकर यांच्या सत्काराचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात प्रमुख अतिथी म्हणून बोलताना हनीफभाई गवळी यांनी वरील विचार व्यक्त केले. शिवसेनेचे शहरप्रमुख जयचंद बाठीया, युवा सेनेचे भूषण घोडे, माजी नगरसेवक पिंटू सुरजन, तौफिक भाई, शेखचांद कुरेशी, रउफभाई ठेकेदार ,आवेश पठाण, सलीम भाई ,अशपाकभाई ,रहीमभाई, शेख अजहरशेठ ,हर्षल गायकवाड प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते.

या परिसरातील मुस्लिम बांधवांसाठी आमदार रायमुलकर यांनी शादीखाना साठी २५ लाखांचा निधी मंजूर करून दिला आहे .त्याबद्दल त्यांच्या सत्काराचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाला मुस्लिम बंधूभगिनींची तोबा गर्दी झाली होती. यावेळी १०८ मुस्लिम युवकांनी शिवसेनेत स्वयंस्फूर्तीने प्रवेश केला त्याबद्दल त्यांचा आमदार रायमुलकर यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. मागील आठवड्यात शहरातील प्रभाग क्रमांक आठ मधील शेकडो मुस्लिम युवकांनी समीर पठाण सर यांच्या नेतृत्वात शिवसेनेत प्रवेश घेतला होता.

सत्काराला उत्तर देताना संजय रायमुलकर म्हणाले की, गेल्या पन्नास वर्षांपासून काँग्रेसने मुस्लिम समाजाचा केवळ मतासाठी वापर केला. कुठलाही विकास केला नाही. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अल्पसंख्यांक विकास महामंडळाच्या माध्यमातून एक हजार कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून दिला. या व्यतिरिक्त इतर योजनांचाही मोठ्या प्रमाणात फायदा अल्पसंख्याक समाजाला मिळेल याची व्यवस्था केली.

महायुतीचे सरकार जातीपातींचा विचार न करता निःपक्षपातीपणाने सर्व घटकांसाठी काम करणारे सरकार आहे. मेहकर शहर व दोन्ही तालुक्यातील अनेक गावांमध्ये शादीखाने कब्रस्तान संरक्षण भिंती आदी कामे मोठ्या प्रमाणात मी केली. मी माणुसकी हा एकच धर्म मानून सतत कार्यकर्ता म्हणून काम करणारा माणूस आहे ,असेही रायमुलकर म्हणाले. आपण सर्वजण सोबत राहू. आपले आशीर्वाद मला द्या, मी आपल्या सेवेत कुठेही कमी पडणार नाही , अशी ग्वाही आमदार रायमुलकर यांनी दिली.

जाती-जातीमध्ये भांडणे लावणारे आता निवडणुकीच्या निमित्ताने येतील. त्यांच्या भूलथापांना बळी पडू नका. काही लोक बाहेरून येतात, निवडणूक लढतात आणि त्यांच्या गावाला निघून जातात. आमचे मार्गदर्शक केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव, मी स्वतः आणि आमचे पदाधिकारी, कार्यकर्ते मात्र अहोरात्र जनतेच्या सेवेत असतात,असेही ते म्हणाले. त्यावेळी जयचंद बाठीया यांनी आपल्या भाषणात आमदार संजय रायमुलकर हे लोकांचे लाडके आमदार असून त्यांच्या माध्यमातून मतदार संघाचा प्रचंड विकास झाला आहे. म्हणून आपण सर्वांनी त्यांच्या सोबत राहून सहकार्य करावे, असे आवाहन त्यांनी केले.

यावेळी सलमान शेख शेख नबी सलमान शहा शेख अल्ताफ रफिक शहा शेख शहीद मोबीन खान जावेद खान फारुख भाई यांच्यासह 108 युवकांनी शिवसेनेत प्रवेश केला त्यांचा सत्कार आमदार रायमुलकर यांच्या हस्ते करण्यात आला. जमीर ठेकेदार, अशिफ पठाण, हरूनभाई ,हबीब कुरेशी, राजीकअली ,इस्माईल कुरेशी, शेख लाल कुरेशी यांच्यासह अनेक मान्यवर प्रामुख्याने उपस्थित होते कार्यक्रमाचे सूत्रसंचालन समीर पठाण यांनी केले.

ताज्या बातम्या

ताज्या बातम्या