spot_img

जानेफळातील वाहतुकीचे तिनतेरा , ट्रॅफिक पोलीस रस्त्यावर वसुलीत दंग तर विटांच्या वाहनांमुळे दुकानदार त्रस्त !

मेहकर (अनिल मंजुळकर. रोखठोक न्युज वृत्तसेवा)

दिवाळीच्या सणाला खरेदी करण्यासाठी जानेफळात प्रचंड गर्दी दिसत आहे. जानेफळ पोलीस स्टेशनचे ट्रॅफिक पोलीस गावाबाहेर चक्क वसुली करताना दिसत आहे. गावातील दुकानदार विट भट्टी च्या वाहने गावातुन जात असल्याने प्रचंड गर्दी होत आहे. वाहनचालकांकडून वसुली केली जात असल्यामुळे बिनधास्त वाहने गावातुन सुरू असल्याने स्थानिक दुकानदार व रस्त्यावर बसणाऱ्या दुकानदारांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे.

जानेफळ पोलीस स्टेशन अंतर्गत एक हि होमगार्ड ची नियुक्ती अद्याप करण्यात आली नाही. दिवाळी ची खरेदी करण्यासाठी खास महिलांसोबत लहान मुले सुद्धा येत आहे. फटाके, कपडे, किराणा खरेदी करण्यासाठी महिलांची गर्दी दिवसभर वाढत असतांना एक हि पोलिस बसस्थानकावर दिसत नाही.

त्यामुळे जानेफळ करानो आपण आपली सुरक्षितता आपणच ठेवा. चोरीच्या घटना सुध्दा घडत आहेत. जानेफळ चे पोलिस फक्त नावालाच दिसत आहे. वाहतूक पोलीस असलेल्या आरसोडे यांना वाहतूक संदर्भात विचारले असता माझी रात्री नाईट होती. व आपल्या पोलिस स्टेशन मध्ये एक हि होमगार्ड नसल्याने पोलिस काहीच करु शकत नसल्याच्या प्रतिक्रिया देण्यात आल्या.

गावाबाहेरुन बायपास झाले असतांना सुध्दा विट भट्टी वरील वाहने वसुली देत असल्याने बिनधास्त पणे गावातुन वाहने टाकत असल्याचे नाव न सांगण्याच्या अटीवर सांगितले. जानेफळात मोटारसायकल, छोटी वाहने, ऑटो व ट्रक, एसटी बस मुळे जानेफळात ट्रॅफिक जाम होते. कधी कधी तर भांडणे सुध्दा होत असल्याचे चित्र आहे. त्यासाठी जानेफळचे ठाणेदार आजीनाथ मोरे यांनी ट्रॅफिक पोलीस अरसोडे यांची तात्काळ बदली करुन गावातील वाहतूक सुरळीत चालू ठेवावी अशी मागणी जोर धरत आहे.

ताज्या बातम्या

ताज्या बातम्या