मेहकर (अनिल मंजुळकर. रोखठोक न्युज वृत्तसेवा)
मेहकर विधानसभा मतदारसंघासाठी महायुतीकडून शिवसेनेचे अधिकृत उमेदवार म्हणून आमदार संजय रायमलकर यांना उमेदवारी जाहीर झाली असून ते आज गुरुवार ता. २४ रोजी निवडणूक निर्णय अधिकारी मेहकर यांचेकडे उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. यावेळी शिवसेना, भाजप, राष्ट्रवादी काँग्रेस आणि महायुती मित्र पक्षांचे पदाधिकारी व मतदारांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन शिवसेनेकडून करण्यात आले आहे.
२००९ च्या विधानसभा निवडणुकीत संजय रामुलकर हे शिवसेनेकडून पहिल्यांदा आमदार म्हणून विजय झाले होते. त्यानंतर २०१४ च्या विधानसभा निवडणुकीत मेहकर मतदार संघातून दुसऱ्यांदा विजय झाले होते. मनमिळावू स्वभाव ,मतदार संघातील जनतेशी सततचा संपर्क आणि विकास कामे या जोरावर २०१९ ची विधानसभा निवडणूक संजय रायमुलकर यांनी विक्रमी मतांनी जिंकली होती. विदर्भात सर्वाधिक मताधिक्य घेणारे ते एकमेव उमेदवार होते. गेल्या पाच वर्षात मेहकर लोणार तालुक्यात विक्रमी विकास कामे झाली आहेत.
आज ते चौथ्यांदा विधानसभा निवडणुकीसाठी मेहकर मतदार संघातून उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. केंद्रीय आयुष ,आरोग्य कुटुंब कल्याण राज्यमंत्री प्रतापरावजी जाधव यांच्यासह शिवसेना भाजप राष्ट्रवादी काँग्रेस आणि महायुतीतील मित्र पक्षाचे पदाधिकारी कार्यकर्ते यावेळी उपस्थित राहणार आहेत. शिवसेना कार्यालय पासून डॉ. बाबासाहेब आंबेडकर वाटिका ,लोणार वेस, बाजारपेठ गल्ली, मार्गे रॅलीने येऊन आमदार रायमुलकर उमेदवारी अर्ज दाखल करतील .त्यानंतर स्वातंत्र्य मैदान येथे जाहीर सभा होणार आहे. ११ वाजता शिवसेना कार्यालय, मेहकर येथे पदाधिकारी कार्यकर्ते व मतदारांना हजारोच्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन शिवसेनेचे जिल्हाप्रमुख प्रा. बळीराम मापारी, उपजिल्हाप्रमुख राजेंद्र गाडेकर, तालुकाप्रमुख सुरेशतात्या वाळूकर , शहर प्रमुख जयचंद भाटिया पांडुरंग सरकटे आदींनी केले आहे.