spot_img

उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी मोठ्या संख्येने उपस्थित रहा, आमदार संजय रायमुलकर यांचे आवाहन….

मेहकर.(अनिल मंजुळकर रोखठोक न्युज वृत्तसेवा )

विश्ववंदनीय बाळासाहेब ठाकरे, महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, केंद्रीय राज्यमंत्री प्रतापराव जाधव या सर्वांच्या आशीर्वादाने मी. गुरुवार दि. 24 ऑक्टोबर रोजी मेहकर लोणार विधानसभा मतदारसंघासाठी उमेदवारी अर्ज दाखल करणार आहे. त्यामुळे मतदार संघातील मतदार राजांनी तसेच महायुतीच्या पदाधिकारी कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन आ. संजय रायमुलकर यांनी केले आहे.
महायुती सरकारने गोरगरीब, सर्वसामान्यांना डोळ्यासमोर ठेवून अनेक समाजपयोगी निर्णय घेतलेले आहेत.त्यामुळे मतदार राजा हा पुन्हा महायुतीचे सरकार महाराष्ट्रामध्ये बनवण्यासाठी महायुतीच्या बाजुने उभा आहे. मतदारराजा आशीर्वादाने. गुरुवारी दि.24 ऑक्टोबर रोजी उमेदवारी अर्ज दाखल करणार आहे. हा उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी मतदार संघातील मतदारांनी मोठ्या संख्येने मेहकर येथील शिवसेना संपर्क कार्यालय येथे सकाळी 11 वाजता उपस्थित राहावे, असे आवाहन आ. संजय रायमुलकर यांनी केले आहे.

ताज्या बातम्या

ताज्या बातम्या