spot_img

उत्कर्ष फाऊंडेशन च्या वतीने मेहकरात भव्य रोजगार मेळाव्याचे आयोजन, शिवसेना नेते सिध्दार्थ खरात सुशिक्षित बेरोजगारांसाठी सरसावले !

मेहकर  (निलेश माने. रोखठोक न्युज वृत्तसेवा)

मेहकर लोणार तालुक्यातील सुशिक्षित बेरोजगार तरुण तरुणींना रोजगार उपलब्ध व्हावा म्हणुन महाराष्ट्र भरातील नामांकित कंपन्यांचे प्रतिनिधी दि.१८ ऑक्टोबर २०२४ रोजी मेहकर येथील कृषी वैभव लॉन येथे प्रत्यक्ष उपस्थित राहणार असून स्वतः हा मुलाखत घेऊन पात्र उमेदवारांना जागेवरच नोकरीचे नियुक्तीपत्र देणार आहेत.उत्कर्ष फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष सिद्धार्थ खरात यांच्या वतीने या रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे.

या मेळाव्याचे उद्घाटक म्हणून बुलढाणा जिल्हा संपर्कप्रमुख खासदार अरविंद सावंत उपस्थित राहणार आहेत, तर प्रमुख अतिथी म्हणून जिल्हा सहसंपर्कप्रमुख प्रा नरेंद्र खेडेकर, जिल्हा प्रमुख जालिंदर बुधवत, जिल्हा उपप्रमुख आशिष रहाटे, मेहकर तालुका प्रमुख निंबाभाऊ पांडव, लोणार तालुका प्रमुख दिपक मापारी ,शहर प्रमुख किशोर गारोळे, ॲड.आकाश घोडे, जिवन घायाळ, ऋषी जगताप श्रीकांत मदनकर संजीवनीताई वाघ, पौर्णिमा ताई गवई, यांची उपस्थिती राहणार आहेत.

तरी दहावी ते सर्व शाखेतील पदवीधर, सर्व शाखेतील इंजिनियर, तसेच इतर व्यवसायिक शिक्षण घेतलेल्या सुशिक्षित बेरोजगार तरुण तरुणींनी आपले शैक्षणिक कागदपत्रे घेऊन मुलाखतीस उपस्थित राहावे, आपल्या शैक्षणिक पात्रतेनुसार मुलाखती झाल्यानंतर तात्काळ नोकरीचे नियुक्तीपत्र देण्यात येणार असून या भागातील जास्तीत जास्त पात्र युवक युवतींनी या संधीचा लाभ घ्यावा असे आवाहन उत्कर्ष फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष सिद्धार्थ रामभाऊ खरात यांनी केले आहे.

ताज्या बातम्या

ताज्या बातम्या