मेहकर (अनिल मंजुळकर. रोखठोक न्युज वृत्तसेवा):
शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या शिकवणी प्रमाणे 80 टक्के समाजकारण आणि 20 टक्के राजकारण करीत मेहकर लोणार मतदार संघातील हजारो कार्यकर्त्यांच्या आवाज बनणारे गोपाल बछिरे यांचा आज वाढदिवस आहे.. उच्चशिक्षित आणि संघटनेच्या तत्वांशी जुळून असलेले लोकाभिमुख नेतृत्व अशी त्यांची ओळख सुरुवातीपासूनच बनली आहे. लहानपणापासूनच जीवनाच्या वाटेवर संघर्ष असताना, परिवाराचा सांभाळ आणि संघटनेचा विचार जोपासण्याचे काम त्यांनी केले. आगामी विधानसभा निवडणुकीच्या दृष्टीने मतदार संघात त्यांच्या नावाची आकांशा उंचावली गेली आहे. अशा नेतृत्वभिमुख व्यक्तिमत्त्वाची संघर्ष गाथा जाणून घेऊया….
डॉ. गोपाल बछीरे यांनी लोणार येथे बारावीपर्यंतचे शिक्षण त्यांनी घेतले. सोय नसल्याने वडील भिकाजी बछिरे व मोठे भाऊ बालचंद्र बछीरे यांनी त्यांना संभाजीनगर येथे उच्च शिक्षणासाठी पाठविले. उच्च शिक्षण घेत असताना आपल्या सोबत शिकणारे विद्यार्थी कमवा व शिका या संकल्पनेची अंमलबजावणी करतात याची जाणीव त्यांना झाली. हे पाहून, घरच्या परिस्थितीची जाणीव ठेवून महिन्याच्या स्कॉलरशिप मधून किमान 50 रुपये आई-वडिलांना ते पाठवत असत. एकदा तर घरून येणारी मनी ऑर्डर त्यांनी परत केली.
व स्वबळावर शिक्षण घेण्याचे ठरवले तांत्रिक ज्ञान व आवड असल्याकारणाने घड्याळ, टेप, टीव्ही, दुरुस्ती, असेंबलींग विक्री, फोटोग्राफी असे अनेक उद्योग शिक्षण घेत असताना त्यांनी पैसा मिळवला. त्याचबरोबर बी.ए., एम.ए., बी.ड्रॉमा, एम. ड्रॉमा, एलएलबी एम.टी.ए, बी.जे, एम.जे, बीएड, एम.फिल, पी.एच. डी. सारख्या पदव्यांचे शिक्षण घेऊन पोलीस त्यानंतर जनसंचार मंत्रालयाचा सुपरवायझर पद भूषविले. या पदव्या सोडून सन 1997 ला सिद्धार्थ महाविद्यालय जाफराबाद येथे प्राध्यापक म्हणून ते रुजू झाले. संस्थाचालक दादासाहेब मस्के यांनी आपल्या पाल्याप्रमाणे त्यांना प्रेम दिले.
संभाजीनगर ते जाफराबाद येत जात असताना राजुर दाभाडी तळेगाव या परिसरात उच्च शिक्षणाची सोय नव्हती बारावीनंतर मुलं मुली शिक्षणापासून वंचित राहत होते ही परिस्थिती बघून सन 2004 मध्ये दाभाडी येथे राजुरेश्वर कला वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय शासनाकडून मान्य करून घेतले व वंचित मुलांना उच्च शिक्षणाचे दार उघडे करून दिले, 2008 मध्ये दुसरे महाविद्यालय संभाजीनगर येथे मंजूर झाले आणि नोकरी करत असतानाच शिक्षण संस्था चालक झाले. तसेच पीएचडी सारख्या सर्वोच्च पदवीचे ते प्रोफेसर गाईड झाले. त्यांनी 82 देशात व 9 परदेशात चर्चासत्र, परिषदांमध्ये सहभाग घेऊन 48 शोधनिबंध सादर करून आंतरराष्ट्रीय मॅगेजीन्स मध्ये छापून आले आहेत.
त्याचबरोबर विद्यापीठाच्या प्रत्येक निवडणुकीत हीहिरीने भाग घेऊन सुरुवातीला कल्चरल सेक्रेटरी, अभ्यास मंडळ सदस्य, विद्या परिषद सदस्य (अकॅडमीक कौन्सिल मेंबर) परीक्षा गैरवर्तन समितीच्या न्यायाधीश या पदावर कार्य केले तसेच औरंगाबाद हिस्ट्री सोसायटीचे सचिव मराठवाडा इतिहास परिषदेचे सहसचिव नंतर उपाध्यक्ष या पदावर कार्यरत आहेत.
सन 2000 पासूनच राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे कार्यकर्ते ते सरचिटणीस या पदावर कार्य केले 2022 मध्ये शिवसेनेत गद्दारी झाल्यानंतर एक आयकॉनिक मुख्यमंत्री उद्धव साहेब ठाकरे यांना मुख्यमंत्रीपदावरून पायउतार व्हाव लागल हे बघून तळपायाची आग मस्तकात गेली आणि विचार राष्ट्रवादीच्या प्राथमिक सदस्य व प्रदेश सरचिटणीस पदाचा राजीनामा देऊन मातोश्रीवर उद्धव साहेब ठाकरे यांच्या हस्ते शिवबंधन बांधून त्यांच्या आदेशाने मेहकर लोणार विधानसभा क्षेत्रात शिवसेनेचे संघटन पुनर्बांधणीस तालुकाप्रमुख संदीप मापारी, नगरसेवक व शहर प्रमुख गजानन जाधव, तालुका उपप्रमुख परमेश्वर दहातोंडे, श्रीकांत नागरे, महिला तालुकाप्रमुख संजीवनी वाघ, ज्येष्ठ शिवसैनिक सुदन अंभोरे, राजू बुधवत, युवा शहरप्रमुख श्रीकांत मादनकर, मेहकर चे तालुकाप्रमुख लिंबाजी पांडव, शहर प्रमुख किशोरभाऊ गारोळे, युवातालुकाप्रमुख आकाश घोडे, युवा शहरप्रमुख ऋषी जगताप, यांच्या सहकार्याने प्रारंभ केला सुरुवातीला लोक जवळ येण्यास घाबरत होते कारण शिंदे यांच्या सोबत फुटलेले खासदार व आमदार त्याचं वास्तव्य येथेच आहे त्यांची भीती सर्वसामान्यांना वाटप होती.
याच दरम्यान चार वर्षापासून लोणचे धारतीर्थ तीर्थस्नाणासाठी पुरातत्त्व विभागाने बंद केले होते ते खुले करण्यासाठी उपोषण, सविनय कायदेभंग, आत्मदहनापर्यंतचे आंदोलन केले व धार तीर्थ खुले केले त्यानंतर सर्वसामान्यांचे शेतकऱ्यांचे, महिलांचे, बेरोजगारांचे प्रश्न घेऊन शासन प्रशासनाशी भांडू लागले, आमदार खासदारशी प्रत्यक्ष खेटू लागले, जनसामान्यांच्या मनातील भीती संपवण्यात त्यांना यश येऊन लोकसभा निवडणुकीत खासदारांच्या मूळ बालेकिल्ल्यात म्हणजेच मेहकर विधानसभा मतदारसंघात शिवसेना उबाठाणे विद्यमान खासदाराच्या बरोबरीची मते घेतली, शेतकरी, कष्टकरी, महिला, बेरोजगार व दिव्यांगांच्या न्याय्य हक्कासाठी 63 आंदोलने करून त्यांना न्याय मिळवून देण्याचे मोलाचे कार्य डॉ. बछिरेंनी यांनी केले, त्याच बरोबर शिवसैनिकांचे 6 मेळावे, शिवसेना खासदार ओमराजे निंबाळकर, शिवसेना नेते मा. खासदार चंद्रकांत खैरे व शिवसेनेच्या फायर बँड नेत्या सुषमाताई अंधारे यांच्या 3 जाहीर सभा स्वबळावर घेऊन, उद्धव साहेबांच्या वाढदिवसानिमित्त विविध समाज उपयोगी कार्यक्रम घेऊन दोन आडीच वर्षाच्या अत्यंत कमी कालावधी शिवसेनेचे एक दमदार नेतृत्व या मतदारसंघात डॉ. गोपाल बछिरेंच्या रूपाने उदयास आल, त्यांच्या कामाची पद्धत, त्यांचं संघटन कौशल्य बघून, जिल्हा संपर्कप्रमुख प्रा. नरेंद्र खेडेकर, जिल्हा सहसंपर्कप्रमुख छगनदादा मेहत्रे व जिल्हाप्रमुख जालिंदर बुधवत यांनी जिल्हा संघटक या अत्यंत महत्त्वाच्या पदावर त्यांची नियुक्ती केली व ते संघटन बांधनिस मोठ्या जोमाने कामाला लागले.
बाळासाहेबांच्या शिकवणीनुसार गाव तिथे शाखा व घर तिथं शिवसैनिक निर्माण करण्याचं काम हाती घेऊन ते पूर्णत्वास नेलं आज मेहकर लोणार विधानसभा मतदारसंघात, शिवसेना उ.बा.ठा. चे भावी आमदार म्हणून जनसामान्यांच्या जिभेवर डॉ. गोपाल बछिरे यांचे नाव आहे.