मेहकर (अनिल मंजुळकर. रोखठोक न्युज वृत्तसेवा )
मेहकर तालुक्यातील ओलांडेश्वर संस्थान दुधा, पांडुरंग संस्थान देऊळगावमाळी, बगदालभ्य ऋषी संस्थान देळप आणि मल्हारी म्हाळसाकांत खंडोबा संस्थान सोनाटी या ब वर्ग प्राप्त तीर्थक्षेत्रांच्या सर्वांगीण विकासासाठी आमदार संजय रायमुलकर यांच्या अथक प्रयत्नातून राज्य शासनाने १४ कोटी ४५ लाख रुपये खर्चाच्या तीर्थस्थळे विकास प्रकल्पाला मंजुरी प्रदान केली आहे.
ग्रामविकास विभाग विभागाच्या वतीने मेहकर तालुक्यातील नोंदणीकृत ब वर्ग प्राप्त ४ तीर्थक्षेत्रांच्या ठिकाणी भाविकांच्या सोयीसाठी विविध विकासकामे व्हावीत म्हणून आमदार संजय रायमुलकर यांनी शासनाकडे प्रकल्प प्रस्ताव सादर करून त्याला मंजुरी देण्याची वेळोवेळी मागणी केली होती .सातत्याने पाठपुरावा केला होता.
त्यांच्या या प्रयत्नांना आता यश मिळाले असून १४ कोटी ४५ लाख रुपयांच्या तीर्थस्थाने विकास आराखड्याला शासनाने मंजुरी प्रदान केली आहे. ओलांडेश्वर संस्थान दुधा ब्रह्मपुरी येथे चार कोटी ५२ लाख ७० हजार रुपयांच्या आराखड्याला मंजुरी मिळाली असून त्यात संरक्षकभिंत दोन लाख ९६ हजार रुपये ,वाहनतळ पेव्हर ब्लॉक आणि कॉंक्रिटीकरण करणे २५ लाख ६९ हजार ,परिसरात पथदिवे लावणे वीस लाख, विद्युतीकरण आणि इतर कामांसाठी तीन लाख रुपये खर्चाच्या विविध कामांचा समावेश आहे.
देऊळगावमाळी येथील श्री पांडुरंग संस्थान साठी दोन कोटी ५० लाख १८ हजार रुपयांच्या तीर्थक्षेत्र विकास आराखड्याला मंजुरी प्रदान करण्यात आली आहे. त्यात भोजन कक्ष ४४ लाख ६५ हजार रुपये , भक्तनिवास ५४ लाख ३४ हजार रुपये ,पोहोचरस्ता ७७ लाख ११ हजार रुपये, विद्युतीकरण आणि इतर कामांसाठी १३लाख ८८ हजार रुपये आदींचा समावेश आहे.
बगदालभ्य ऋषी संस्थान देळप उटी येथील विकासासाठी तीन कोटी ६१ लाख ५७ हजार रुपये मंजूर झाले असून त्यात भक्तनिवास चाळीस लाख २६ हजार रुपये, पोहोच रस्ता एक कोटी ८२ लाख , पथदिवे वीस लाख ,विद्युतीकरण व इतर कामांसाठी सात लाख ४२ हजार व इ एस आर कामांसाठी २४ लाख ४७ हजार रुपये मंजूर करण्यात आले आहेत .
मल्हारी म्हाळसाकांत खंडोबा संस्थान सोनाटी इथल्या विकासासाठी तीन कोटी ८०लाख ६३ हजार रुपये मंजूर झाले आहेत. यात प्रसादालय दोन कोटी ३६ लाख ९५ हजार रुपये ,वाहनतळ अकरा लाख ९७ हजार रुपये ,विद्युतीकरण व इतर कामे २९लाख ६ हजार आणि इतर कामांचा यात समावेश आहे.
तालुक्यातील या चारही तीर्थक्षेत्रांच्या ठिकाणी वर्षभर विविध धार्मिक व सामाजिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येते .यात्रा महोत्सव ही साजरा होतो. या तीर्थस्थळांच्या विकासासाठी आमदार रायमुलकर यांनी या आधीही भरीव निधी उपलब्ध करून दिलेला होता. मोठ्या संख्येने या सर्व तीर्थस्थळी भाविक मोठ्या संख्येने येतात.
त्यांच्यासाठी विविध सुविधा निर्माण करता याव्यात म्हणून आमदार संजय रायमुलकर यांनी केंद्रीय मंत्री प्रतापरावजी जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली राज्य शासनाकडे विविध विकासकामांचे प्रस्ताव दाखल केले होते . ग्रामविकास विभागाचे सहसचिव का. गो.वळवी यांच्या स्वाक्षरीने प्रसिद्ध करण्यात आलेल्या ता.७ ऑक्टोबर च्या परिपत्रकात तालुक्यातील वरील १४ कोटी ४५ लाख रुपये खर्चाच्या ४ तीर्थक्षेत्र विकास प्रकल्पांना मंजुरी देण्यात आली आहे.
महायुती सरकारने ग्रामीण भागातील भाविकांना अधिक सोयीसुविधा उपलब्ध करून देण्यासाठी ब वर्ग दर्जाच्या तीर्थस्थळांच्या विकासासाठी पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांच्या नावाने ही योजना सुरू केली.मेहकर तालुक्यातील ४ तिर्थस्थळांसाठी भरीव निधी उपलब्ध करून दिल्याबद्दल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ,उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ,अजितदादा पवार ,ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांचे आभार .इतरही ठिकाणचे प्रस्ताव दिले आहेत.त्यासाठी प्रयत्न सुरू आहेत.