spot_img

राज्याला सक्षम करण्याचे काम मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि महायुती सरकारने केले आहे – खासदार डॉ.श्रीकांत शिंदे

मेहकर (अनिल मंजुळकर. रोखठोक न्युज वृत्तसेवा)

आज रात्री मेहकर येथे शिवसेना जनसंवाद दौऱ्यानीमित्त आयोजित स्वातंत्र्य मैदानावरील विशाल जाहीर सभेत डॉ .श्रीकांत शिंदे म्हणाले की, एकनाथ शिंदे हे संवेदनशील मुख्यमंत्री आहेत .ते स्वतःला कार्यकर्ते समजतात .दिवसरात्र कामात गुंतून असतात .राज्यातील लोकांचे ते लाडके मुख्यमंत्री आहेत,असे सर्वत्र दिसते. मुख्यमंत्री शिंदे यांच्या नेतृत्वाखाील महायुती सरकारने राज्याला सक्षम करण्याचे काम केले आहे.

ते पुढे म्हणाले की, संगणक परीचारकांच्या मानधनात लवकरच वाढ होणार असल्याचे संकेत आहेत. घरी बसून राज्य चालवणाऱ्या पूर्वीच्या मुख्यमंत्र्यांना लोकांनी घरी बसवले. त्यांची लायकी येत्या विधानसभा निवडणुकीत त्यांना लोक दाखवतील.एकनाथ शिंदे लोकांचे अपार प्रेम लाभलेले एकमेव मुख्यमंत्री आहेत. हात दाखवा मुख्यमंत्री थांबवा , असे मुख्यमंत्री आहेत. ते सतत लोकांच्या गर्दीत असतात.शेकडो योजनांच्या माध्यमातून महाराष्ट्र सक्षम करण्याचे काम बाळासाहेबांच्या विचारावर चालून एकनाथ शिंदे यांनी केले.

व्यासपीठावर माजी खासदार संजय निरुपम , शशिकांत खेडेकर ,आमदार भावना गवळी , विठ्ठल सरप, यांच्यासह अनेक पदाधिकारी उपस्थित होते . यावेळी आपल्या भाषणात केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव म्हणाले की, माझ्यासारख्या शेतकरी कुटुंबातील खासदाराला केंद्रीय मंत्री मुख्यमंत्री शिंदे यांनी केले. उध्दव ठाकरे यांनी दोन आमदारांच्या मंत्री पदाच्या संधी डावलून स्वतःच्या मुलाला मंत्री केले. मी नऊ वेळा शिवसेना पक्ष व धनुष्यबाण चिन्ह घेऊनच लढलो.एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वातील शिवसेना हीच खरी शिवसेना आहे.

शिंदे व महायुती सरकारने राज्यातील सर्व समाज घटकांना शेकडो योजनांच्या माध्यमातून भरभरून दिले. पूर्वी तीस टक्के शेतकरी पीकविमा भरत होते ,आता एक रुपयात पीकविमा असल्याने सर्व शेतकरी प्रस्ताव भरत आहेत.लाडकी बहिण योजनेसाठी ४६ हजार कोटींची तरतूद केली.

पंतप्रधान मोदीजी हे देशाला गतीने प्रगतीकडे नेत आहेत.विधानसभा निवडणुकीत महायुतीला मोठ्या संख्येने मतदान करून पुन्हा हेच सरकार आणण्याचे त्यांनी आवाहन केले. आमदार संजय रायमुलकर म्हणाले की, मतदारसंघाच्या विकासासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची मोठी मदत झाली.

शेतकरी,महिला वर्गाला त्यांनी विविध योजनांच्या माध्यमातून भरीव आर्थिक मदत केली. उबाठा च्या एका नेत्याने मेहकर गद्दारांचे शहर आहे ,असे म्हटले ,त्याचा मी निषेध करतो. यावेळी भाऊसाहेब चौधरी यांचे भाषण झाले.

यावेळी शिवसेनेचे जिल्हाप्रमुख बळीभाऊ मापारी, जिल्हा उपप्रमुख राजेंद्र गाडेकर, तालुका प्रमुख सुरेशतात्या वाळूकर,भगवानराव सुलताने , शहर प्रमुख जयचंद बाठीया , बाजार समिती सभापती माधवराव जाधव , युवासेनेचे जिल्हा प्रमुख ऋषिकेश जाधव, नीरज रायमुलकर,केशवराव जागृत , भूषण घोडे ,भगवानराव ,राठोड,नितीन राऊत,हर्षल कुसळकर,हर्षल लक्ष्मण गायकवाड, कोकाटे, महिला आघाडीच्या मायाताई म्हस्के, कविताताई दांदडे,अंजली गवळी, वैशालीताई सावजी , दत्ता खरात , मनोज जाधव , बबनराव भोसले , रामराव म्हस्के , बबनराव तुपे , मनोज जाधव, पिंटू सूर्जन , भास्करराव राऊत , हिंमतराव सानप , डॉ.काशिनाथ घुगे , रविराज रहाटे , गजेंद्र मापारी, आशाताई झोरे,अक्काताई गायकवाड, गणेश बोचरे,नंदु बंगाळे प्रामुख्याने उपस्थित होते.सभेला प्रचंड गर्दी झाली होती.कार्यक्रमाचे संचालन जयचंद बाठीया यांनी केले.

ताज्या बातम्या

ताज्या बातम्या