मेहकर :(अनिल मंजुळकर. रोखठोक न्युज वृत्तसेवा)
दोन दिवस अगोदर सिध्दार्थ खरात यांनी मेहकरात परिवर्तन मोर्चा काढला होता. त्यामध्ये लोणार व मेहकर तालुक्यातील शिवसेने तर्फे मशाल पेटविणयासाठी जमवण्यासाठी लय धडपड केली पण् गटबाजीमुळे खरात अपयशी ठरल्याचे दिसून आले. आणि निष्ठावंत शिवसैनिक प्रकाश डोंगरे यांच्या गळ्यात उ. बा. ठा. ची माळ गळ्यात पडणार असल्याचे शिवसेनेच्या कार्यकर्त्यांमध्ये कुजबुज सुरु असल्याचे बोलल्या जात आहे. मेहकर व लोणार तालुक्यातील प्रत्येक गावात सिद्धार्थ खरात यांचे परिवर्तन मोर्चाचे बॅनर व पोस्टर झळकले. लाखो रुपये खर्च करून परिवर्तन मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते.
सिद्धार्थ खरात यांनी विधमान आमदार संजय रायमुलकर यांच्यावर निष्क्रिय लोकप्रतिनिधी म्हणून आरोपांच्या फैरी झाडल्या. तसेच लोकसभा निवडणुकीत पराभूत झालेल्या नरेंद्र खेडेकर यांनी सुध्दा आग ओकली. शासनाच्या विरोधात भाषणे करून मोकळे उ. बा. ठा. गटाचे जिल्ह्यातील नेते मोकळे झाले. पण् मेहकर शहरात मशाल पेटविण्यासाठी जसा जोश पाहिजे होता. तसा दिसला नसल्याने सिध्दार्थ खरात यांची परिवर्तनाच्या नावांवर फेल झाल्याचे शिवसैनिक बोलत आहे. त्यामुळे भावी आमदार होण्याची ब्रेक लागण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
उ. बा. ठा .गटात गटबाजी…..
पंधरा वर्षापासून शिवसेनेचे निष्ठावंत नेते युवा सेनेचे उपजिल्हाप्रमुख पदाचे काम पाहत आहेत. युवा वर्गाला आकर्षित करण्यासाठी प्रकाश डोंगरे नवीन शक्कल लढवत असतात. मेहकरात परिवर्तन मोर्चाचे आयोजन करण्यात आले असता ते गैरहजर होते. त्यामुळे
उ. बा. ठा. गटातच खुलेआम गटबाजी दिसून येत असल्याचे बोलल्या जात आहे. बुलडाणा येथे झालेल्या मशाल पेटविण्यासाठी प्रकाश डोंगरे आवर्जून हजर होते. पण् मेहकरात प्रकाश डोंगरे हजर नसल्याने युवा वर्गाची सुध्दा परिवर्तन मोर्चाला हजरी दिसुन आली नाही.
डॉ. गोपाल बछिरे यांनी सुध्दा आपल्या कार्यकर्त्यांसोबत मोर्चा सोडुन निवेदन दिल्याने उ. बा. ठा. गटात एकच चर्चेचा विषय ठरला. त्यामुळे गटबाजी दिसून आल्याने सिध्दार्थ खरात यांच्या भावी आमदारांचे स्वप्न पूर्ण होणार नसल्याचे स्पष्ट दिसत आहे. प्रकाश डोंगरे यांच्या उ. बा. ठा . गटाची माळ गळ्यात पडणार असल्याचे शिवसेनेच्या नेत्यांमध्ये चर्चिला जात आहे.