जवळपास आठ कोटी रुपये खर्च करून छत्रपती शिवाजी महाराज उद्यानाचे सौंदर्यीकरण आणि शिवरायांचा भव्य पुतळा बसविण्याचे काम शहरातील नागरिकांना अभिमान वाटेल अशा पद्धतीने करण्यात येत आहे, अशी माहिती आमदार संजय रायमुलकर यांनी दिली.
मेहकर शहरात केंद्रीय आयुष, आरोग्य, कुटुंब कल्याण राज्यमंत्री (स्वतंत्र प्रभार) प्रतापराव जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली आमदार संजय रायमुलकर यांच्या प्रयत्नातून शहर विकासाची ३५० कोटींपेक्षा जास्तीची कामे प्रगतीपथावर असून छत्रपती शिवाजी महाराज उद्यानाचे सौंदर्यीकरणचे काम प्रगतीत आहे. त्याची पाहणी आज आमदार संजय रायमुलकर यांनी केली त्यावेळी ते बोलत होते.
उद्यानामध्ये असलेल्या तलावाच्या मध्यभागी छत्रपती शिवरायांचा भव्य पुतळा बसविण्यात येणार असून त्यासाठीच्या पुलाचे बांधकाम सुरू आहे .उद्यानाच्या सौंदर्यकरणाची इतर कामेही वेगाने सुरू आहेत. विकास कामांच्या पाहणी दरम्यान कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती माधवराव जाधव, शिवसेनेचे तालुकाप्रमुख सुरेशतात्या वाळूकर ,शहर प्रमुख जयचंद बाठिया, ऋषी जाधव, अभियंता अजय मापारी, भुजंगराव रहाटे, मनोज बुंदे , पुणे येथील आर्किटेक्चर अल्हाट आदी यावेळी उपस्थित होते.
उद्यानात अण्णाभाऊ साठे महात्मा ज्योतिबा फुले सावित्रीबाई फुले यांचे पुतळेही बसविण्यात येणार आहेत. दोन कोटी रुपये खर्चून अशोक वाटिका मधील अशोका भवन व इतर कामे करण्यात येणार आहेत .त्यासाठीही आमदार संजय रायमुलकर यांनी पुरेसा निधी उपलब्ध करून दिला आहे.
तेथील विकास कामांची पाहणीही संजय रायमुलकर आणि इतर पदाधिकाऱ्यांनी केली. पंचपीर दर्गा या ठिकाणी २७ लाख रुपये खर्चून बांधण्यात येत असलेल्या स्वागत कमानीच्या कामाचे ठिकाणीही मान्यवरांनी भेट देऊन पाहणी केली.
मेकर शहरात रस्त्यांची व नाली बांधकामाचे कामे संरक्षक भिंती सभामंडप आधी 350 कोटींची कामे जवळपास पूर्ण झालेली आहेत मेहकर शहरासाठी 111 कोटी रुपयांची वाढीव पाणीपुरवठा योजनेचे कामही प्रगतीत आहे.
शहरासाठी भूमिगत गटारे निर्मितीचे कामही करण्यात येणार असल्याची माहिती आमदार संजय रायमुलकर यांनी दिली आणखीही ११९ कोटी रुपयांची शहर विकासाची अमृत दोन योजनेतील कामे येत्या आठवड्यात मंजूर होतील, अशी माहिती त्यांनी दिली.