spot_img

उद्या शिवसेनेच्या लोणार मेहकर तालुक्यातील पदाधिकारी,कार्यकर्त्यांचा मेळावा मोठ्या संख्येने शिवसैनिकांना उपस्थित राहण्याचे आवाहन –

मेहकर ( अनिल मंजुळकर. रोखठोक न्युज वृत्तसेवा)

मेहकर लोणार तालुक्यातील शिवसेनेचे सर्व पदाधिकारी आणि सक्रिय कार्यकर्त्यांचा मेळावा मेहकर येथे रविवारी तारीख २२ रोजी वृंदावन लॉन, बायपास रोड येथे सकाळी दहा वाजता आयोजित करण्यात आला आहे. केंद्रीय आयुष, आरोग्य, कुटुंब कल्याण राज्यमंत्री प्रतापराव जाधव ,आमदार संजय रायमुलकर यावेळी मार्गदर्शन करणार आहेत.

आगामी विधानसभा निवडणुकीच्या दृष्टीकोनातून या महत्त्वाच्या मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. शिवसेना जिल्हाप्रमुख प्रा. बळीभाऊ मापारी ,युवासेनेचे जिल्हाप्रमुख ऋषीभाउ जाधव, महिला आघाडीच्या जिल्हाप्रमुख मायाताई म्हस्के , उपजिल्हाप्रमुख राजेंद्र गाडेकर, मेहकर तालुकाप्रमुख सुरेश तात्या वाळूकर, लोणार तालुकाप्रमुख भगवानराव सुलताने ,मेहकर शहर प्रमुख जयचंद भाटिया, लोणार शहर प्रमुख पांडुरंग सरकटे, युवा सेनेचे तालुका अध्यक्ष भूषण घोडे ,युवासेनेचे तालुकाप्रमुख गजानन मापारी, महिला आघाडीच्या तालुकाप्रमुख कविताताई दांदडे ,अंजलीताई गवळी, वैशालीताई सावजी आदींच्या प्रमुख उपस्थितीत हा मेळावा पार पडणार आहे.

दोन्ही तालुक्यातील शिवसेनेचे पदाधिकारी, शाखाप्रमुख व इतर पदाधिकाऱ्यांनी मेळाव्याला मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन शिवसेनेकडून करण्यात आले आहे.

ताज्या बातम्या

ताज्या बातम्या