मेहकर (अनिल मंजुळकर. रोखठोक न्युज वृत्तसेवा)
स्थानिक लक्ष्मीनगर आणि शामकुंजनगर मधील दोन सिमेंट रस्त्यांचे भूमिपूजन आज ता.२१ रोजी आमदार संजय रायमुलकर यांच्या हस्ते झाले.एक तासात लगोलग साहित्य,यंत्रणा आणून कामाला प्रारंभ करण्यात आल्याने परिसरातील रहिवाशांनी आनंद व्यक्त केला आहे.
नगरोत्थान एकात्मिक शहर विकास योजनेच्या माध्यमातून सदर सिमेंट रस्त्यांचे काम आजपासून सुरू करण्यात आले. केंद्रीय राज्यमंत्री प्रतापराव जाधव आणि आमदार संजय रायमुलकर यांच्या अथक प्रयत्नातून शहर हद्दवाढ झाल्यानंतर नवीन भागांमधे मोठ्या प्रमाणावर रस्ते ,नाल्या बांधकाम आदी कामे मोठ्या प्रमाणात सुरू करण्यात आली आहेत.
नागरिकांच्या मागणीनुसार लक्ष्मीनगर आणि शामकुंजनगर या भागातील सिमेंट रस्त्यांचे काम आजपासून सुरू करण्यात आले आहे. यावेळी आमदार संजय रायमुलकर , आहेत शिवसेनेचे तालुकाप्रमुख सुरेशतात्या वाळूकर ,युवासेनेचे भूषण घोडे, राजुभाऊ मुंदडा , जितुभाऊ सावजी यांचा सत्कार अनिल पह्राड, हिरामण लांडकर , गोपाल वैराळ,दीपक अग्रवाल यांच्या हस्ते करण्यात आला. रुपेश गणात्रा,दीपक जवंजाळ, गोपाल शिरसाट, सुनील जवंजाळ , गोपाल इनकर, भास्कर कासतोडे , विवेक निकम, संतोष लांडकर, दत्ता जवंजाळ , स्वप्नील मैराळ, गजानन वणवे, परमेश्वर जांगिड, विशाल लांडकर , गणेश लांडकर ,किसन गोरे, प्रकाश चौधरी आदी यावेळी प्रामुख्याने उपस्थित होते.
मंजूर असलेली शहरातील सर्व रस्त्यांच्या व इतर विकासकामांना गती देण्याच्या सूचना सर्व संबंधित यंत्रणांना देण्यात आल्या असून कामांचा दर्जा उत्तम असेल याची काळजी घेण्याबाबत सक्त आदेश देण्यात आल्याची माहिती यावेळी बोलतांना आमदार संजय रायमुलकर यांनी दिली.