मेहकर (अनिल मंजुळकर. रोखठोक न्युज वृत्तसेवा)
आमदार संजय रायमुलकर यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित केलेल्या निबंध स्पर्धेत शालेय गटात अनन्या धांडे तर खुल्या गटात काजल सुभाष सरकटे आणि वक्तृत्व स्पर्धेत शालेय गटात ईश्वरी वासुदेव उगले व दिव्या योगेश म्हस्के ,खुल्या गटात शिवाजी मारुती डोंगरदिवे हे स्पर्धक प्रथम क्रमांकाचे विजेते ठरले आहेत.
नांद्रा धांडे येथील संत गजानन महाराज चॅरिटेबल ट्रस्ट तर्फे आमदार संजय रायमुलकर यांच्या वाढदिवसानिमित्त वक्तृत्व स्पर्धेचे हिवरा आश्रम येथे आयोजन करण्यात आले होते. त्याबरोबरच निबंध स्पर्धेचेही आयोजन करण्यात आले होते. आज चॅरिटेबल संस्थेचे अध्यक्ष नीरज रायमुलकर यांनी दोन्ही स्पर्धेचे निकाल येथे जाहीर केले. वक्तृत्व स्पर्धेचे परीक्षक म्हणून प्रा. वसंत गिरी आणि प्रा. डॉ. सविता पवार यांनी काम पाहिले तर निबंध स्पर्धेचे परीक्षक म्हणून मे. ए.सो. महाविद्यालय मेहकर चे मराठी विभाग प्रमुख प्रा. डॉ. एस. डब्ल्यू .पदमने यांनी काम पाहिले.
वक्तृत्व स्पर्धत शालेय विद्यार्थी गटात प्रथम क्रमांकाचे बक्षीस ईश्वरी वासुदेव उगले व दिव्या योगेश म्हस्के यांना सात हजार एक रुपयाचे बक्षीस विभागून देण्यात येणार आहे.द्वितीय क्रमांक तन्मय विशाल दिनोदे पाच हजार रु. , तृतीय सर्वेश्वर महादेव राठोड तीन हजार रू. आणि सोहम गजानन कायंदे , जान्हवी मनोज नांदगावकर , गणेश दिनेश भावले यांना प्रत्येकी अकराशे रुपयाची तीन उत्तेजनार्थ बक्षिसे जाहीर झाली आहेत. खुल्या गटात शिवाजी मारुती डोंगरदिवे प्रथम क्रमांक रु. नऊ हजार रुपये , द्वितीय क्रमांक विवेक प्रमोद पिंजरकर सात हजार एक रू., अभिजीत महादेव राठोड तृतीय क्रमांक रुपये पाच हजार , रू.अकराशे,सातशे,पाचशे ची तीन उत्तेजनार्थ बक्षीसे अनुक्रमे सारंग शंकर तायडे, ऋषिकेश संजय चांदणे, भूपेंद्र शिवदास सावकारे यांना देण्यात येणार आहेत.
निबंध स्पर्धेत शालेय गट प्रथम क्रमांक अनन्या सतीश धांडे तीन हजार शंभर रू., द्वितीय क्रमांक स्वराज शिवप्रसाद थुटे एकवीसशे रू., तृतीय दिव्या योगेश म्हस्के अकराशे रू . , सातशेची दोन उत्तेजनार्थ बक्षिसे अविष्कार रामदास नखाते व यजुर्व भगवान राईतकर आणि खुल्या गटात प्रथम बक्षीस रु. एकेचाळीसशे काजल सुभाष सरकटे , द्वितीय रु.एकतीसशे गायत्री लक्ष्मण सावंत, तृतीय रू.एकविसशे साहिल नसीम बेग आणि उत्तेजनार्थ रु. अकराशे शुभम सुनील दळवी, श्रुती रविकांत आढाव रु. सातशे , ऋतुजा कैलास जाधव रु.५०० याप्रमाणे विजेत्यांची घोषणा संत गजानन महाराज चॅरिटेबल संस्थेचे अध्यक्ष नीरज संजय रायमुलकर यांनी केली असून लवकरच विशेष सोहळ्यात बक्षिसांचे वितरण मान्यवरांच्या हस्ते करण्यात येणार आहे, असेही त्यांनी सांगितले.