मेहकर / अनिल मंजुळकर
केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री प्रतापराव जाधव आणि आमदार संजय रायमूलकर यांच्या अथक प्रयत्नातून मंजूर झालेल्या 585 कोटी 29 लाख खर्चाच्या पेनटाकळी प्रकल्पाच्या 11 किलोमीटर अंतर मुख्य कालव्याच्या आर सी सी ट्रफ कामाचा शुभारंभ आज आमदार संजय रायमूलकर यांच्या हस्ते झाला.पेनटाकळी सिंचन प्रकल्पाचा मुख्यकालवा तांत्रिकदृष्ट्या असफल ठरल्याने शेतीमध्ये पाणी पाझरून मोठया प्रमाणावर नुकसान झाल्याने 2003 सालापासून या विरोधात शेतकऱ्यांची अनेक आंदोलने झाली. विद्यमान केंद्रीय राज्यमंत्री प्रतापराव जाधव आणि आमदार संजय रायमूलकर यांनी शासनदरबारी कालव्याच्या कामासाठी अथक प्रयत्न केले.
अनेक बैठका झाल्या. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांच्या आदेशाने विदर्भ पाटबंधारे विकास मंडळाने कालव्याच्या आर सी सी ट्रफ कामासाठी 585 कोटी 29 लाख रुपये मंजूर केले. आज विधिवत पुजाविधी करून आमदार संजय रायमूलकर यांच्या हस्ते नारळ फोडून या कामाच्या पहिल्या टप्प्याचा शुभारंभ दुधा येथे करण्यात आला.
उपअभियंता मिलिंद तमागडे, अभियंता राजगुरू, कंत्राटदार ऋषिकेश देशमुख, ओलांडेश्वर संस्थानचे अध्यक्ष मंचकराव देशमुख, शिवसेनेचे तालुकाप्रमुख सुरेशतात्या वाळूकर,एकनाथ सास्ते, गजानन मुळे, पत्रकार सिद्धेश्वर पवार, नागेश महाकाळ, नंदकिशोर पागोरे, नरेंद्र बह्मपुरीकर, पिंटू धोंडगे, विशाल पवार, एकनाथ आव्हाळे, दीपक देशमुख, अमोल म्हस्के, बाळू माहाकाळ आदी प्रामुख्याने उपस्थित होते.
सव्वातीन कोटी शेतकऱ्यांच्या बँक खात्यात
परिसरातील शेतकऱ्यांनी यावेळी आमदार रायमूलकर यांच्याकडे तक्रार केली की,कालवा पाझरल्याने शेतपिकांचे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना 5 कोटी 38 लाख प्रतापराव जाधव, आमदार रायमूलकर यांच्या प्रयत्नातून मंजूर झाले ते काही शेतकऱ्यांच्या खात्यात आले नाही.आमदार संजय रायमूलकर यांनी तातडीने अधिकाऱ्यांना याबाबत सूचना देताच शेतकऱ्यांच्या बँक खात्यात आज सव्वातीन कोटी रुपये जमा करण्यात आले.
असाच प्रकार मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेच्या बाबतीत घडला असल्याचे नागरिकांनी सांगितल्यावर आमदार रायमूलकर यांनी हिवरा आश्रम येथील ग्रामीण बँक शाखेत जाऊन व्यवस्थापक शेख यांना विचारणा करून महिलांच्या खात्यातील रक्कम देण्याबाबत सांगितले. आज साडेचार लाख रुपये महिलांना बँकेने तातडीने वितरण केले.