spot_img

लाडकी बहीण योजनेच्या सदस्यपदी मेहकर मतदारसंघांसाठी समाधान साबळे, राजीव तांबिले यांची नियुक्ती

मेहकर (अनिल मंजुळकर)

मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेच्या प्रभावी अमलाबजावणीसाठी जिल्हाधिकारी डॉ.किरण पाटील यांनी विधानसभा मतदारसंघ निहाय अशासकीय सदस्यांच्या नियुक्त्या जाहीर केल्या असून मेहकर लोणार साठी अशासकीय सदस्य म्हणून समाधान साबळे, राजीव सीताराम तांबिले यांची नियुक्ती केली आहे.

जिल्हाधिकारी यांनी आज निर्गमित केलेल्या आदेशान्वये मेहकर मतदारसंघासाठी आमदार संजय रायमूलकर अध्यक्ष असून सदस्य म्हणून समाधान साबळे, राजीव तांबिले यांची नियुक्ती केली असून सदस्य समाधान साबळे यांचा आमदार संजय रायमूलकर यांच्या हस्ते आज शिवसेना कार्यालयात सत्कार करण्यात आला.

यावेळी कृषि उत्पन्न बाजार समितीचे सभापती माधवराव जाधव, रामेश्वर बोरे, केशवराव खुरद, भाष्कर निकम, मंगेश गायकवाड, मधुकर सातपुते, विजय जागृत, सुरेश आडे, सुरेश धांडे, दत्ता पाटील, भाई कैलास सुकदाने आदींसह इतर पदाधिकारी उपस्थित होते.सदर समितीची बैठक ता. 17 ऑगस्ट रोजी मेहकर येथे नगरपालिका सभागृहात महिला व बालविकास विभागाने आयोजित केली असून त्यात मेहकर, लोणार तालुक्याचा लाडकी बहीण योजनेचा आढावा घेण्यात येणार आहे.

बँक अधिकाऱ्यांनी सहकार्य करावे
……………………………………….
राष्ट्रीयीकृत आणि सहकारी बँका, पोस्ट ऑफिसेस इथल्या अधिकारी, कर्मचारी यांनी महिलांना बँक खाते उघडणे, के वाय सी करणे यासाठी योग्य ते सहकार्य करून शासनाच्या या योजनेच्या प्रभावी अंमल बजावणीसाठी सहकार्य करावे, असे आवाहन आमदार संजय रायमूलकर यांनी केले आहे.काही बँकांच्या बाबतीत तक्रारी आल्या असून जर बँकेच्या अधिकारी, कर्मचारी यांच्या वर्तनात सुधारणा झाली नाही तर कारवाईस सामोरे जावे लागेल, असा इशाराही त्यांनी दिला आहे.महसूल यंत्रनेनेही महिलांना विविध दाखले देण्याच्या बाबतीत तत्परता दाखवावी, असेही आमदार रायमूलकर यांनी आवाहन केले आहे.

ताज्या बातम्या

ताज्या बातम्या