spot_img

जिजामाता विद्यालयात भव्य आरोग्य शिबीर संपन्न श्री कृपा जवंजाळ हॉस्पिटलचा उपक्रम | हजारों रुग्णांनी घेतला लाभ !

मेहकर (अनिल मंजुळकर. रोखठोक न्यूज वृत्त सेवा)

जिजामाता विद्यालय हिवरा खुर्द येथे आज दिनांक 07 मार्च ला श्रीकृपा जवंजाळ हॉस्पिटल चिखली यांच्या वतीने भव्य मोफत आरोग्य तपासणी व रोग निदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. सुप्रसिद्ध मधुमेह तज्ञ व हृदयरोग तज्ञ डॉक्टर श्री अमित माधवराव आरसोडे,(एमडी मेडिसिन, फेलोशिप इन टू डी इको), चिखली येथील डॉ. संदीप जवंजाळ (अस्थिरोग तज्ञ), डॉक्टर संतोष सोनवणे (न्यूरो सर्जन), डॉक्टर गौरी सदावर्ते (त्वचारोग तज्ञ), डॉक्टर पूजा मोरे (दंतरोग तज्ञ), या सर्व तज्ञ चिकित्सकांची या भव्य शिबिरामध्ये सेवा लाभली.

जेष्ठ डॉक्टर हनुमानभाऊ लाहोटी साहेब हिवरा खुर्द यांचे हस्ते रिबिन कापून या शिबिराचे उद्घाटन करण्यात आले. याप्रसंगी जिजामाता परिवार हिवरा खुर्दचे अध्यक्ष माधवरावजी आरसोडे, जिजामाता विद्यालय हिवरा खुर्द चे प्राचार्य संजयजी जारे सर, डॉ. गोपाल हिवरकर (हिवरा खुर्द) इसोली, डॉ. भूषण पठाडे, संत ज्ञानेश्वर पतसंस्था हिवरा खुर्द चे तज्ञ संचालक राजेंद्रजी ढोमणे साहेब, व्यवस्थापक देशमुख साहेब, उद्धवराव दळवी, उत्तमराव तांबे, जिजामाता परिवार हिवरा खुर्द चे उपाध्यक्ष संकेत माधवराव आरसोडे यांचे समवेत जिजामाता परिवाराचे सर्व सदस्य उपस्थित होते…

यासह पांडुरंग तात्या ठोंबरे यांनी शाल व श्रीफळ देऊन या आयोजना बद्दल डॉ.अमित आरसोडे यांचा ह्रदयस्थ सत्कार केला…

परिसरातील रुग्णांनी ही या रोगनिदान शिबिराला उत्स्फूर्त असा प्रतिसाद दिला. ज्यांना आजार होता ते…. व ज्यांना आपल्या आजाराचे निदान करायचे होते अशा अनेक रुग्णांनी शिबिरामधे उपस्थीती लावली होती…

शिबिराच्या यशस्वीतेसाठी श्रीकृपा जवंजाळ हॉस्पिटलचे सर्व कर्मचारी व जिजामाता परिवाराच्या सर्व सदस्यांनी उत्साहाने एकत्रित काम करुन शिबिर यशस्वीतेने संपन्न केले…

जिजामाता विद्यालय हिवरा खुर्द येथे आयोजित या उपक्रमाचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे… कार्यक्रमाचे नियोजन व व्यवस्थापन यामुळे रुग्ण आनंदी दिसत होते . तद्वतच संपूर्ण सेवा ही मोफत उपलब्ध असल्यामुळे सर्वसामान्यांना याचा खूपच लाभ झाला .


शिबिरामधे आपली अमूल्य सेवा प्रदान करणाऱ्या सर्व मान्यवर डॉक्टरांचा माधवरावजी आरसोडे यांचे हस्ते शाल,श्रीफळ व पूष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला… शिबिरानिमित्त येणाऱ्या सर्व रुग्णांचे, श्रीकृपा जवंजाळ हॉस्पिटल चिखली व जिजामाता परिवाराच्या वतीने मनस्वी आभार व्यक्त करण्यात आले..

ताज्या बातम्या

ताज्या बातम्या