spot_img

जिजामाता विद्यालय हिवरा खुर्द येथे आमदार संजय रायमुलकर यांची भेट | शालेय विकासासाठी सर्वतोपरी मदत करणार

मेहकर (अनिल मंजुळकर) मा.मुख्यमंत्री माजी शाळा सुंदर शाळा या अभियानाचे 30 उपक्रम विद्यार्थी, शिक्षक, शिक्षका, शिक्षकेतरकर्मचारी व शाळा व्यवस्थापन समिती या सर्वांच्या माध्यमातून राबविणे सुरू आहे. त्यासाठीची आवश्यक ती सर्व तयारी सर्वतोपरी करण्याचा प्रयत्नही विद्यालयाकडून होताना दिसतो आहे. याच अनुषंगाने आणि या तयारीची पाहणी करण्यासाठी मेहकर तालुका विधानसभा मतदारसंघाचे आमदार डॉक्टर संजयजी रायमुलकर यांनी दिनांक 11 फेब्रुवारी 2024 ला विद्यालयाला भेट दिली.व परिसर पाहून आनंद व्यक्त केला.

विद्यार्थ्यांनी त्यांना ‘गार्ड ऑफ ऑनर’ देऊन त्यांचे विद्यालयात जंगी स्वागत केले. राष्ट्रमाता राजमाता माँ जिजाऊंच्या प्रतिमेचे पूजनानंतर संस्थेचे अध्यक्ष माधवराव आरसोडे यांनी आमदार संजय रायमुलकर यांचे पुष्पगुच्छ व शाल देऊन स्वागत केले त्यानंतर प्राचार्य संजय जारे सर यांनी मंचस्थ दिलीप देशमुख, जानेफळ चे सरपंच पती गजानन वडणकर, सागर देवकर, संजय उतपुरे, किशोर पाटील या मान्यवरांचे स्वागत करून कार्यक्रमाला सुरुवात झाली.

आपल्या संपूर्ण निरीक्षणाचा लेखाजोखा आमदार साहेबांनी आपल्या भाषणातून व्यक्त केला. शाळेची शिस्त, शाळेची गुणवत्ता व क्रीडा क्षेत्रातील विद्यार्थांचे यश या सर्वच बाबींचा उल्लेख आमदार साहेबांनी केला. अध्यक्षांचे मार्गदर्शन, शिक्षकांचे परिश्रम आणि मुख्याध्यापकांचा निर्देशनामध्ये चालणाऱ्या माननीय मुख्यमंत्री माजी शाळा सुंदर शाळा या अभियानाच्या सर्व उपक्रमांची यथायोग्य अंमलबजावणी शाळास्तरावर पूर्ण झालेली पाहून त्यांनी समाधान व्यक्त केले.

केवळ हे सर्व उपक्रम या दीड महिनाच नव्हे तर मागील पंधरा वर्षापासून विद्यालयामध्ये अशा प्रकारचे 30 ते 35 उपक्रम राबविले जातात याची माहिती ही प्राचार्य श्री संजय जारे सर यांनी साहेबांना दिली. शालेय विकासासाठी यापुढे कुठल्याही प्रकारची मदत लागत असल्यास ती पूर्ण करण्याचे आश्वासनही आमदार साहेबांनी शाळा व्यवस्थापन समितीला दिले.

कार्यक्रमा साठी शाळा व्यवस्थापन समितीचे सर्व सदस्य, सर्व शिक्षक, शिक्षिका,कर्मचारी,विद्यार्थी व सन्माननीय पालक हजर होते. आमदार साहेबांनी संपूर्ण जिजामाता परिवाराला विजयी शुभेच्छा देऊन आपल्या भाषणाला विराम दिला. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयघोषाने कार्यक्रमाची सांगता करण्यात आली… कार्यक्रमाचे संचालन धोटे सर यांनी केले तर आभार कुरकुटे सर यांनी मानले.

ताज्या बातम्या

ताज्या बातम्या