मेहकर (अनिल मंजुळकर): अनेकांचे संसार दारु वरलीमटका चक्री ने उद्धवस्त होत असल्याच्या घटना घडत आहेत. अवैध धंदे सुरू असल्याने आत्महत्या चे प्रमाण जोमात सुरू आहे. अशातच कंळबेशवर येथील महिलांनी अवैध धंदे बंद करुण ग्रामसभेत ठराव सुध्दा पारीत केला असल्याने व जानेफळ पोलीस स्टेशन ला सुध्दा अवैध धंदे बंद करण्यासाठी पत्र दिले आहे. नवीन तडफदार ठाणेदार आजीनाथ मोरे अवैध धंदे बंद करण्यासाठी पुढाकार घेणार का ? अशी चर्चा परिसरात सुरू आहे.
नुकत्याच ग्रामपंचायतीच्या निवडणुका पार पडल्या. यामध्ये कंळबेशवर गावात डॉ. केशवराव अवचार यांच्या पॅनलचा दणदणीत विजय झाला. व गावात विकास कामांची शुभारंभ पार पाडत प्रजासत्ताक दिनाच्या दिवशी गावातील महिलांनी एकजुटीने बैठका घेतल्या व अवैध धंदे बंद करण्यासाठी पुढाकार घेऊन ग्रामपंचायतीचा ठराव पारित करुन ठराव मंजूर करण्यात आला. ठरावात गावात सुरू असलेल्या अवैध धंदे जसे खुलेआम दारू विक्री, वरली मटका, चक्री, व इतर व्यवसाय बंद उल्लेख करण्यात आला आहे.
कंळबेशवर येथे सुरू असलेल्या अवैध धंदे बंद करण्यात यावे अन्यथा गावकऱ्यांकडून कोणत्याही प्रकारे कायदा व सुव्यवस्थेचे उल्लंघन झाल्यास ग्रामपंचायत व गावकरी जबाबदार राहणार नाहीत. अशा प्रकारे तहसीलदार कार्यालय मेहकर, उपविभागीय पोलिस अधिकारी, अधिक्षक राज्य उत्पादन शुल्क विभाग बुलडाणा, व जिल्हाधिकारी कार्यालय बुलढाणा व ईतरांना प्रतिलिपी पाठवण्यात आले आहे.
त्यामुळे अवैध धंदे बंद करण्यासाठी जानेफळ चे तरुण तडफदार ठाणेदार आजीनाथ मोरे अवैध धंदे बंद करण्यासाठी पुढाकार घेणार का? अशी परिसरात चर्चा सुरू आहे. कंळबेशवर येथील महिलांना न्याय मिळणार कि नाही हे सुद्धा पहावे लागणार आहे.